महाराष्ट्र हादरला...महाविद्यालयाच्या परिसरातच शिकाऊ डॉक्टरची हत्या

 महाराष्ट्र हादरला...महाविद्यालयाच्या परिसरातच  शिकाऊ डॉक्टरची हत्यायवतमाळ : यवतमाळ येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात धक्कादायक घटना घडली आहे. येथील एका शिकाऊ विद्यार्थी डॉक्टरची हत्या करण्यात आली असून त्याचे नाव डॉ. अशोक पाल असे आहे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या परिसरातच ही हत्या करण्यात आलीय. बुधवारी संध्याकाळी ही घटना घडली असून हत्येचे नेमके कारण काय हे अद्याप अद्याप समजू शकलेले नाही.

यवतमाळ येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात डॉ. अशोक पाल मागील काही दिवसांपासून शिकाऊ डॉक्टर म्हणून काम करत होते. मात्र बुधवारी मध्यरात्री त्यांची अमानुषपणे हत्या झाली. ही हत्या अज्ञात व्यक्तीने केली असून शिकाऊ डॉक्टरचा मृतदेह महाविद्यालयाच्या परिसरातच आढळला. या घटनेची माहिती होताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. पोलिसांनी पंचनामा केला असून तपास सुरु केलाय.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post