अनैतिक संबंधातून प्रियकराच्या मदतीने पतीला पायाला दगड बांधून विहीरीत

 अनैतिक संबंधातून प्रियकराच्या मदतीने पतीला पायाला दगड बांधून विहीरीत ढकलले...खून प्रकरणाचा झाला उलगडा....
धुळे : सोनगीर (ता. धुळे) ते बाभळे (ता. शिंदखेडा) शिवारातील जुन्या मुंबई- आग्रा महामार्गालगत शेतविहिरीत ४६ वर्षांच्या अनोळखी व्यक्तीचा मृतदेह बुधवारी (ता. ३) दुपारी आढळला. त्याचा पत्नीसह प्रियकराने खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले. शिंदखेडा पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले. 

अनैतिक संबंधातून निंबा रुपला पाटील (वय ४६, रा. सोनगीर) यांचा खून झाला असून, या प्रकरणी त्यांची पत्नी अनिता व प्रियकर शरद शालिग्राम पाटील (वय ४१, रा. सोनगीर) पोलिसांच्या ताब्यात आहेत. निंबा पाटील, पत्नी अनिता व तीन मुलींसह सोनगीर येथील इंदिरानगरमध्ये वास्तव्यास आहेत. पती निंबा चरित्र्यावर संशय घेत पत्नीला सतत मारहाण करत होता. या त्रासाला कंटाळून तिने प्रियकर शरद पाटील यास पती निंबा याला संपविण्यास सांगितले. त्यानुसार शरद याने २० ऑक्टोबरला रात्री निंबा यास दारू पाजून ठार करत विहिरीत फेकून दिले.

निंबा पाटील २१ ऑक्टोबरपासून कामाला जातो, असे सांगून घरातून निघाला. मात्र, बारा दिवस झाले तरी तो परतला नाही म्हणून हरवल्याची तक्रार पोलिस ठाण्यात दाखल होती. तत्पूर्वी ४ ऑक्टोबरला त्याच्या पत्नीने पती मारहाण करतो, अशी फिर्याद दिली होती.

संशयित शरद याने मृत निंबा याच्या हाताला ॲल्युमिनिअमची तार, पायाला दगडासह वायर बांधून विहिरीत फेकून दिले होते. पुरावा नष्ट करण्यासाठी मृत निंबा याचे कपडे काढून केवळ बनियन व अंडरपॅंट राहू दिली गेली. बाजारात ॲल्युमिनिअमची तार विकत मिळत नाही. ती कशी आली? यावरून पोलिसांनी तपास सुरू केला. हा धागा पोलिसांना संशयितांपर्यंत घेऊन गेला. याप्रकरणी शिंदखेडा पोलिस ठाण्यात चिमठाणे पोलिस दूरक्षेत्राचे हवालदार सदेसिंग चव्हाण यांच्या फिर्यादीनुसार खुनाचा गुन्हा दाखल झाला होता. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post