गुटखा तस्करी प्रकरण भोवले....शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखाची मुख्यमंत्री ठाकरेंनी केली गच्छंती

गुटखा तस्करी प्रकरण भोवले....शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखाची मुख्यमंत्री ठाकरेंनी केली गच्छंती 



बीड : गुटखा तस्करी प्रकरणात गुन्हा दाखल झालेले शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांच्या पदाला स्थगिती देण्यात आली आहे. नवीन शिवसेना बीड जिल्हा प्रमुखाची नियुक्ती लवकरच जाहीर करण्यात येईल, अशी माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून देण्यात आली आहे. 

पाच दिवसांपूर्वी बीड जिल्ह्यात तीन ते चार ठिकाणी गुटख्याच्या गोदामावर छापा घालत प्रशिक्षणार्थी पोलीस अधीक्षक कुमावत यांच्या पथकाने लाखो रुपयांचा गुटखा पकडला होता. यावेळी हा सगळा धंदा शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांचा असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर खांडे आणि आबा मुळे यांच्यासह चार जणांवर गुन्हा दाखल झाला. या सगळ्या प्रकाराची दखल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतली. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना मध्ये बीड जिल्हाप्रमुख पदाला स्थगिती अशा मथळ्याखाली वृत्त देण्यात आले आहे. शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसेना बीड जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांच्या पदाला स्थगिती देण्यात आली असून नवीन जिल्हाप्रमुखाचे नाव पक्षप्रमुख लवकरच जाहीर करतील असे म्हटले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post