एसटी संपाबाबत आंदोलनकर्त्या एसटी कामगारांविरोधात कारवाईचा बडगा

 एसटी संपाबाबत  आंदोलनकर्त्या एसटी कामगारांविरोधात कारवाईचा बडगामुंबई: मागील काही दिवसांपासून संपावर असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन आता आणखी चिघळण्याची शक्यता आहे. एसटी महामंडळ प्रशासनाने आता संपकरी एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी एसटी महामंडळ प्रशासनाने विविध कारणांखाली राज्यातील 376 कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली आहे. राज्यातील 16 विभागातील 45 आगरांमधील 376 कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यास सुरुवात झाली आहे. 

राज्याचे परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी सोमवारी एसटी कर्मचाऱ्यांना संप मागे घेण्याचे आवाहन केले. प्रवाशांना वेठीस धरू नये असेही त्यांनी म्हटले होते. संपकरी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे संकेतही त्यांनी दिले होते. अखेर आज मंगळवारी एसटी महामंडळ प्रशासनाने संपकरी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यास सुरुवात केली. 

नांदेडमधील किनवट, भोकर, माहूर, कंधार, नांदेड, हादगाव, मुखेड, बिलोली, देगलूर या आगारातील 58 कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. त्याशिवाय वर्धा जिल्ह्यातील वर्धा, हिंगणघाट आगारातील 40, यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा, राळेगाव, यवतमाळ आगारातील 57, सांगली जिल्ह्यातील जत, पलुस, इस्लामपूर, आटपाडी आगारातील 58 कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post