जिल्हा रूग्णालय अग्निकांड... त्या चार जणांना इतक्या दिवस पोलीस कोठडी

   जिल्हा रूग्णालय अग्निकांड...   चार जणांना दोन दिवसांची पोलिस कोठडीअहमदनगर(प्रतिनिधी)- जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागाला लागलेल्या आगप्रकरणी काल मंगळवारी अटक केलेल्या चार जणांना पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने आज दिला.  


आरोपींमध्ये एक वैद्यकीय अधिकारी व तीन परिचारिकांचा समावेश आहे. वैद्यकीय अधिकारी विशाखा शिंदे, परिचारिका सपना पठारे, आस्मा शेख आणि चन्ना आनंत यांना काल अटक करण्यात आली आहे. पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके यांनी आज बुधवारी या चार जणांना न्यायालयासमोर हजर केले.


न्यायालयाने त्यांना दोन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश केला आहे. 0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post