कोनशिलेवरील 'ती' मोठी चूक लक्षात आणून देत अजितदादांनी स्वतःच्याच कपाळावर हात मारला... पारनेर मधील प्रकार

 कोनशिलेवरील 'ती' मोठी चूक लक्षात आणून देत अजितदादांनी स्वतःच्याच कपाळावर हात मारला... पारनेर मधील प्रकारनगर:  पारनेर तालुक्यातील पिंपळनेर येथे संत श्रेष्ठ निळोबाराय यांच्या अभंग गाथेच्या दुसर्‍या आवृत्तीचे प्रकाशन संपन्न करण्यात आले. यावेळी संत निळोबाराय यांचे निवासस्थान असलेला वाडा आणि मंदिर याचा जीर्णोद्धार होणार असल्याने या कामाचे भूमिपूजन या मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं. 

आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, आ.निलेश लंके यांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या भूमिपूजनवेळी कोनशिलेचे अनावरण झाल्यानंतर अजितदादा यांच्या चाणाक्ष नजरेने एक मोठी चूक अचूक हेरली.

 कोनशीलेवर असलेले पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या मुश्रीफ या नावांमध्ये झालेल्या शाब्दिक चूक  अजितदादांनी  दाखवून   कपाळावर हात मारून घेतला.

या कोनशिलेवर  मुश्रीफ या शब्दांऐवजी 'मुस्त्रिफ अशी शब्दरचना करण्यात आली होती. ही बाब समोर येताच उपस्थित असलेले कार्यक्रमाचे आयोजक आणि संबंधित चांगलेच खजिल झाले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post