१ कोटी ८ लाख १८ हजार रुपये किंमतीचा विदेशी मद्याचा साठा ट्रकसह जप्त

 महाराष्ट्र शासनाचा महसुल बुडवुन गोवा राज्यातुन  वाहातुक करणारा ट्रक पनवेल - सायन महामार्गावर जप्त.

१ कोटी ८ लाख १८ हजार रुपये किंमतीचा विदेशी मद्याचा साठा ट्रकसह जप्त

राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र भरारी पथकाची उल्लेखनीय कारवाईमुंबई :प्रतिनिधी विक्रम बनकर दिनांक २०.११.२०२१ रोजी निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथक, महाराष्ट्र राज्य, मुंबई या पथकास खात्रीशीर माहीती प्राप्त झाली होती की, पनवेल सायन महामार्गावरुन गोव्याकडून मुंबईच्या दिशेने मध्यरात्रीच्या सुमारास भारत बेंझ कंपनीच्या ट्रक क्र. MP-09-HJ-8696 या मालवाहक ट्रकमधून महाराष्ट्र शासनाचा महसूल बुडवून गोवा राज्यातून आयात केलेल्या व फक्त गोवा राज्यातच विक्रीकरीता निर्मिती केलेल्या परंतु, महाराष्ट्र राज्यात विक्रीकरिता प्रतिबंधित असलेल्या अवैध विदेशी मद्याची विक्रीच्या उद्देशाने बेकायदेशीर वाहतूक केली जाणार आहे. सदर माहीतीच्या अनुषंगाने पनवेल - सायन मार्गावरील रोडपाली फाट्यावरील उड्डाण पुलाखाली, ता. पनवेल, जि. रायगड येथे पाळत ठेवून सापळा रचण्यात आला होता. सदर वेळी केलेल्या कारवाईमध्ये महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंधित असलेल्या अवैध गोवा विदेशी मद्याचे १२९५ बॉक्स जप्त करुन २ आरोपींना अटक करुन त्यांच्या ताब्यातून रु. १ कोटी ८ लाख १८ हजार रुपये इतक्या किंमतीचा मुद्देमाल पंचासमक्ष बारा चाकी ट्रकसह जप्त करण्यात आला.


सदर प्रकरणी अटक व संशयित आरोपींच्या विरोधात महाराष्ट्र दारुबंदी कायदा, १९४९ चे कलम ६५ (a) (e) ८१, ८३ व ९० अन्वये कारवाई करुन गुन्हा रजि. क्र. ३८७/२०२१ दिनांक २०.११.२०२१ रोजी नोंद करण्यात आली आहे.

सदरच्या कारवाईची माहिती खालीलप्रमाणे,

जप्त वाहन भारत बेंझ कंपनीचा एक 3123-BS-III प्रकारचा बारा चाकी मालवाहक ट्रक क्र. MP-09-HJ-8696

१. रॉयल ब्लू व्हिस्की १८० मिली क्षमतेच्या प्रति बॉक्स ४८ बाटल्यांनी भरलेले १२९० बॉक्स

२. आरोपींच्या ताब्यात मिळून आलेले दोन भ्रमणध्वनी संच

३. दारु साठा लपविण्याकरिता वापरण्यात आलेल्या काजू छिलका / टरफले / सालींच्या गोण्या.

वाहनासह जप्त मुद्देमालाची एकूण किंमत रुपये १ कोटी ८ लाख १८ हजार एवढी आहे.

या गुन्ह्यात अटक करण्यात आलेले आरोपी

१. योगेश विष्णुप्रसाद मीना, वय ३८ वर्षे (ट्रक चालक)

राहणार : घर नं. ७२, मु. अकबरपूर पो. डब्बल चौकी ता. जि. देवास, मध्यप्रदेश ४५५२२१

२. राहुल बाबुलाल भिलाला, वय २० वर्षे (ट्रक क्लिनर)

राहणार : मु. आनंदपुर डॉगरिया, पो. सिया, ता. जि. देवास, मध्यप्रदेश ४५५००१

आरोपीला जेएमएफसी पनवेल कोर्टासमोर हजर केले असता त्याला सात दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post