विक्रम राठोड यांच्यावर पक्षाने सोपवली मोठी जबाबदारी....

 

विक्रम राठोड यांच्यावर पक्षाने सोपवली मोठी जबाबदारी, युवा सेनेच्या सहसचिव पदी निवडनगर:‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌ युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष माजी नगरसेवक विक्रम राठोड यांची पक्षाने युवा सेनेच्या राज्याच्या सहसचिव पदी निवड केली आहे. युवासेना प्रमुख तथा मंत्री आदित्य ठाकरे यांच्या मान्यतेने ही निवड झाली आहे. विक्रम राठोड हे शिवसेनेचे दिवंगत माजी मंत्री अनिल राठोड यांचे सुपुत्र आहेत. युवासेनेच्या माध्यमातून त्यांना आता राज्य स्तरावर संघटनेचे काम करण्याची संधी मिळाली आहे. नगरमध्ये शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी या निवडीबद्दल त्यांचं अभिनंदन केले आहे.  


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post