नगर जिल्ह्यात महाविकास आघाडीचे गणित बिघडणार.... राष्ट्रवादीच्या 'घड्याळा'साठी मतं मागणार नाही... विधानसभेचे उपाध्यक्ष राहिलेल्या बड्या नेत्याची सडेतोड भूमिका...

 

नगर जिल्ह्यात महाविकास आघाडीचे गणित बिघडणार.... राष्ट्रवादीच्या 'घड्याळा'साठी मतं मागणार नाही... विधानसभेचे उपाध्यक्ष राहिलेल्या बड्या नेत्याची सडेतोड भूमिका... नगर :  पारनेरमध्ये शिवसेनेचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला शिवसेनेचे जिल्हा प्रभारी मंत्री तथा राज्याचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख उपस्थित होते. मंत्री शंकरराव गडाख यांना विजय औटींचे कौतुक केले. 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विधानसभेचे माजी उपाध्यक्ष विजय औटी होते. यावेळी संपर्कप्रमुख भाऊ कोरेगावकर, सभापती काशिनाथ दाते, सभापती गणेश शेळके, उपजिल्हाप्रमुख रामदास भोसले, तालुकाप्रमुख विकास रोहकले, श्रीकांत पठारे, युवा सेना प्रमुख नितीन शेळके, शहरप्रमुख निलेश खोडदे, अनिकेत औटी, युवराज पठारे उपस्थित होते.

मंत्री शंकरराव गडाख म्हणाले, महाविकास आघाडी सरकार बनविताना अनेक अडचणी आल्या. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना काही निर्णय घ्यावे लागले ते कार्यकर्त्यांना अडचणीचे ठरत आहेत. याची जाणीव मलाही आहे. मला मंत्री व्हायचे नव्हते मात्र ती संधी मला मिळाली मात्र औटी यांच्या पराभवाने पारनेरकरांनी मंत्री पदाची संधी हुकवली, असे मत शंकरराव गडाख यांनी व्यक्त केले.

गडाख पुढे म्हणाले, जिल्हाभरातून मेळाव्याच्या माध्यमातून शिवसैनिकांची मरगळ झटकून टाकली आहे. राजकारणात पदोपदी फसविले जाते अपयश येते. स्वतःची ताकद सिद्ध करावी लागते आणि विकासकामे करावी लागतात. महसूल, पोलिस प्रशासनाने शिवसैनिकांना त्रास देऊ नका, मी पण गडाख आहे. मुख्यमंत्री शिवसेनेचा आहे हे लक्षात ठेवा, असा इशारा गडाख यांनी दिला.

आगामी येणाऱ्या बाजार समिती, नगरपंचायत जिल्हा परिषद, पंचायत समिती या निवडणुका समविचारी लोकांना बरोबर घेऊन लढणार आहोत. यात घड्याळाला मत द्या असे कधीच म्हणणार नाही, असे वक्तव्य करत या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर जाणार नसल्याचे विजय औटी यांनी जाहीर केले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post