माळशेज घाटात पहाटे गाडी खोल दरीत कोसळली, महिला जागीच ठार....सहा जण गंभीर जखमी

 माळशेज घाटात पहाटे भीषण कार अपघातात, महिला जागीच ठार....सहा जण गंभीर जखमी जुन्नर : कल्याण - नगर मार्गावरील माळशेज घाटात आज रविवार ता.०६ रोजी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास झालेल्या भीषण कार अपघातात एक महिला जागीच ठार झाली असून सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. 

माळशेज घाटातील लाजवंती पॉईंट जवळ इको कार क्रमांक.एम.एच.०५ ई. क्यु. १६६३ कारवरील चालकाचा ताबा सुटल्याने गाडी खोल दरीत कोसळली. यावेळी गाडीने पेट घेतल्याने गाडी जळुन खाक झाली असल्याचे सांगण्यात आले. या दुर्घटनेत सखुबाई उगले वय ५५ ही महिला मयत झाली असून उषा सूर्यकांत कोकणे, उर्मिला चंद्रकांत लागे, पांडुरंग नामदेव मिलखे, सोनाली गणेश काटे, ऋषीकेश सूर्यकांत कोकणे (सर्वांचा पत्ता माहित नाही) व चालक आकाश शंकर गेगजे (रा.कल्याण) हे जखमी झाले आहेत. सर्व जखमींना उल्हासनगर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अशी माहीती टोकावडे पोलीस ठाण्याचे अधिकारी एस.डी.दराडे यानी दिली.  मोरोशी येथील भैरवगडावर जात असलेल्या औरंगाबाद येथील ट्रेकर्सनी घटनास्थळी मदत केल्याने सहा जणांचे लोकांचे जीव वाचवले.  

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post