इंदोरीकर महाराज लस घेत नाहीत, तोपर्यंत कीर्तन होऊ देऊ नका

इंदोरीकर महाराज लस घेत नाहीत, तोपर्यंत कीर्तन होऊ देऊ नका बीड : प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदोरीकर यांनी लस घेईपर्यंत, त्यांच्या कीर्तनावर बंदी आणण्यात यावी, अशी मागणी बीडच्या शेतकरीपुत्राने मुख्यमंत्र्यांना केलीय. ही मागणी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत करण्यात आलीय. कोरोनाची लस घेतलीही नाही आणि घेणारही नाही, असं इंदोरीकर महाराज 3 नोव्हेंबर रोजी म्हणाले होते. त्यांच्या याच वक्तव्याविरोधात ही मागणी करण्यात आलीय.


“काही दिवसांपूर्वी इंदुरीकर महाराजांनी मी लस घेणार नाही, असं वक्तव्य केलं होतं. या वक्तव्यामुळे जनजागृती करणाऱ्यांचं खच्चीकरण होत आहे. त्यामुळे इंदुरीकर महाराज जोपर्यंत लस घेत नाहीत, तोपर्यंत त्यांचे कीर्तन होऊ देऊ नये,” असं बीडमधील एका किसानपुत्राने म्हटलंय. या नव्या मागणीमुळे इंदोरीकर महाराज आता पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post