पोलिस दलात खळबळ...सहकार्याच्या त्रासाला कंटाळून महिला पोलिस कर्मचाऱ्याची आत्महत्या


पोलिस दलात खळबळ...सहकार्याच्या त्रासाला कंटाळून महिला पोलिस कर्मचाऱ्याची आत्महत्यापुणे :  पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात पोलीस कर्मचाऱ्याच्या त्रासाला कंटाळून एका 26 वर्षीय महिला पोलीस कर्मचाऱ्याने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

दीपाली बापूराव कदम  असे आत्महत्या केलेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. पोलीस दलातील एका पोलीस कर्मचाऱ्यावर आरोप करीत महिला पोलिसाने आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेल्याने पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.

दीपाली या वसई येथील पोलीस स्टेशनमध्ये शिपाई म्हणून कार्यरत होती. दीड महिन्यापूर्वी तिचे लग्न भोसरी येथील तरुणाशी ठरले होते. दरम्यान आरोपी वाल्मिक गजानन आहिरे हा दिपालीला वारंवार फोन करून मानसिक त्रास देत होता. लग्न जमल्यानंतर सासरच्या मंडळींना आरोपी वाल्मिक आहिरे याने फोन करून जीवे मारण्याची धमकी दिली होती. धक्कादायक म्हणजे, आरोपी हा विवाहित होता. तरीही दीपालीला वारंवार त्रास देत होता. दीपालीच्या भावाने त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पण, त्याने त्यालाही दमबाजी करून जीवे मारण्याची धमकी दिली.

या त्रासाला कंटाळून दिपालीने देलवडी येथे राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी वाल्मिक गजानन आहिरे याच्यावर यवत पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post