राष्ट्रवादीला आणखी एक धक्का....अजित पवारांशी संबंधित ‘त्या’ मालमत्तांवर जप्ती, आयकर विभागाची कारवाई

राष्ट्रवादीला आणखी एक धक्का....अजित पवारांशी संबंधित ‘त्या’ मालमत्तांवर जप्ती, आयकर विभागाची कारवाई
 मुंबई –  माजी गृहमंत्री अनिल देशमुख ईडीसमोर हजर झाले. १३ तासांच्या चौकशीनंतर अनिल देशमुखांना ईडीने अटक केली आहे. देशमुखांच्या अटकेला काही तास उलटत नाही तोवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरही कारवाई करण्यात आली. आयकर विभागाने अजित पवारांच्या ५ मालमत्ता जप्त करण्याचे आदेश दिले.


अनिल देशमुख आणि अजित पवार  यांच्यावरील कारवाईनंतर भाजपा नेते किरीट सोमय्या  यांनी सत्ताधारी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. किरीट सोमय्या म्हणाले की, उशीरा का होईना न्याय मिळाला अशी राज्यातील जनतेची भावना असेल. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरील कारवाईनंतर राज्यातील १० मंत्री त्यांच्याकडे सॉलिसिटरच्या ऑफिसमध्ये गेले असतील असा दावा. १० नेत्यांनी मनी लॉन्ड्रिंग केले आहे. भ्रष्टाचाराचा पैसा बेनामी असतो, रोकड असते. तो किती दिवस ठेवायचा. हवालाच्या माध्यमातून या पैशाची गुंतवणूक होती. काळ्याचा पांढरा करुन गुंतवणूक केली जाते. या १० नेत्यांची अवस्था बिकट होणार आहे असा दावा सोमय्यांनी केला.

त्याचसोबत १० नेत्यांच्या घरावर आयकर विभाग, ईडी धाड टाकण्याची शक्यता आहे. सध्या कारवाई सुरु झाली आहे. अनिल देशमुख, अजित पवार यांच्यावर कारवाई झाली आहे. शरद पवारांमध्ये हिंमत असेल तर अजित पवारांवरील कारवाई थांबवून दाखवावी. 

* जरंडेश्वर शुगर फॅक्ट्री

बाजार मूल्य: सुमारे 600 कोटी* साऊथ दिल्लीमधीली फ्लॅट

बाजार मूल्य: सुमारे 20 कोटी


* पार्थ पवार यांचं निर्मल ऑफिस

बाजार मूल्य: सुमारे 25 कोटी


*निलय नावाने गोव्यात बनलेला रिसॉर्ट

बाजार मूल्य: सुमारे 250 कोटी


* महाराष्ट्रात 27 वेगवेगळ्या ठिकाणी जमीन

बाजार मूल्य: सुमारे 500 कोटी

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post