मतदारसंघात फिरायला आ.रोहित पवारांना पोलिस बंदोबस्त कशासाठी ? विकासकामे फक्त सोशल मिडियातच दिसतात...

मतदारसंघात फिरायला आ.रोहित पवारांना पोलिस बंदोबस्त कशासाठी ? विकासकामे फक्त सोशल मिडियातच दिसतात... नगर : कर्जत नगरपंचायतीची निवडणूक तोंडावर आल्याने भाजप विरुध्द राष्ट्रवादी वादाला तोंड फुटले आहे. भाजपकडून आ.रोहित पवार यांना लक्ष्य करण्यात येत आहे. मतदारसंघात फिरायला आमदार रोहित पवारांना पोलिस बंदोबस्त कशासाठी, असा सवाल भाजप नेते दादासाहेब सोनमाळी यांनी उपस्थित केला आहे. त्यांनी दिलेल्या प्रसिद्धिपत्रकात नमूद केले आहे, की नव्या पर्वाची आगळीवेगळी सुरवात झाली आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर रोहित्रांचा वीजपुरवठा खंडित केल्यामुळे तालुक्यातील शेतकरी अडचणीत सापडला आहे.

वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी बिल भरायचे, की दिवाळी साजरी करायची, असा प्रश्न यामुळे तालुक्यातील शेतकरी व जनतेला पडला आहे. खंडित वीजपुरवठ्यामुळे तर लोकप्रतिनिधी पोलिस बंदोबस्तात फिरत नाहीत ना? गेल्या दोन वर्षांत आमदार पवार यांनी मतदारसंघातील अनेक गावांत मोठ्या प्रमाणावर विकासकामे केली, असा गवगवा ते सोशल मीडियात करीत आहेत. ऐन दिवाळीच्या तोंडावर कर्जत तालुक्यातील शेतीपंप व घरगुती वीजजोड असलेल्या अनेक रोहित्रांचा वीजपुरवठा महावितरणने तोडला आहे. दोन वर्षांत एकही ठोस विकासकाम नाही.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post