बाजार समितीच्या निवडणुका पुढे.... अगोदर 'या' निवडणुका घ्या खंडपीठाचे आदेश

बाजार समितीच्या निवडणुका पुढे.... अगोदर 'या' निवडणुका घ्या खंडपीठाचे आदेश

औरंगाबाद - (www.mazamaharashtra.com)

बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत मतदार असलेल्या प्राथमिक विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायट्यांच्या निवडणुका प्रथम घ्याव्यात, त्या नंतरच बाजार समितीच्या निवडणुका घ्याव्या, असे आदेश उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणला दिले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातीलच नव्हे तर संपूर्ण राज्यातील बाजार समित्यांच्या निवडणुका पुन्हा एकदा पुढे ढकलल्या जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. (www.mazamaharashtra.com)

राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाच्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुका घेण्याच्या निर्णयास विविध सहकारी सोसायट्यांचे सभासद आणि संचालकांनी याचिका दाखल करून आव्हान दिले होते. या याचिका न्या. संजय गंगापूरवाला व न्या. आर. एन. लड्डा यांनी निकाली काढल्या. राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण बाजार समितींसह सहकारातील विविध संस्थांच्या निवडणुकीसाठी स्थापन करण्यात आलेले आहे. प्राधिकरणाने २१ ऑक्टोंबर २०२१ रोजी राज्यातील बाजार समितींच्या निवडणुका घेण्यासंबंधी अधिसूचना जारी केली. 

निवडणुका २३ नोव्हेंबर २०२१ पासून पुढे तीन महिन्यात घेण्याचे निश्चित केले. प्राथमिक सहकारी सोसायट्यांचे संचालक बाजार समिती निवडणुकीत मतदार असतात. कोरोनामुळे निवडणुका होऊ शकल्या नाहीत. सोसायट्यांवर प्रशासकांची नियुक्ती करण्यात आलेली असून काहींचा कालावधी संपला आहे. बाजार समितीमध्ये १८ संचालकांपैकी ११ संचालक सोसायटी मतदारसंघातून निवडून येतात. (www.mazamaharashtra.com)

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post