नवीन वर्षात राज्यात सत्ताबदल... चंद्रकांत पाटील यांचे मोठं वक्तव्य

 

नवीन वर्षात राज्यात सत्ताबदल... चंद्रकांत पाटील यांचे मोठं वक्तव्यकोल्हापूर : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील  यांनी महाविकास आघाडीबाबत महत्वाचे विधान केलं आहे. ''महाविकास आघाडी सरकार आता काहीच दिवसांचे राहिले आहे. येणाऱ्या नवीन वर्षात राज्यात सत्ताबदल होईल,'' असा गौप्यस्फोट भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केला.

कोल्हापूर विधानपरिषदेसाठी भाजप उमेदवार अमोल महाडिक यांचा उमेदवारी अर्ज सोमवारी भरण्यात आला. त्या पार्श्‍वभूमीवर झालेल्या पत्रकार परिषदेत चंद्रकांत पाटील बोलत होते. यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले, ''विधानपरिषदेच्या निवडणुकीत अमोल महाडिक मोठ्या फरकाने निवडून येतील. कारण जिल्ह्यातील नगरपालिकांमध्ये भाजप लोकप्रतिनिधींची संख्या अधिक आहे.''

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post