अविरत सेवेची ३६ वर्ष... ग्रामसेवक युनियनचे राज्य अध्यक्ष एकनाथ ढाकणे यांनी व्यक्त केल्या भावना....

 *अविरत सेवेची ३६ वर्ष*           मित्रहो आज माझ्या नोकरीची अविरत सेवेची अहर्निशी ग्रामसेवेची ३६ वर्ष पूर्ण होत आहेत.मी आजच्या दिवशीच दिनांक १९/११/१९८५ ग्रामसेवक म्हणून सेवेत दाखल झालो. आणि आज सुद्धा ग्रामसेवक म्हणूनच सेवेत कार्यरत आहे.

           १९ तारखेला सेवेत दाखल होत असताना वय वर्ष १९होते. अशा या अल्प वयापासून तर आज वय वर्ष ५५ वर्षे वयापर्यंत मी स्वतः शासनाची समाजाची जनतेची राष्ट्राची कुटुंबाची देवतेची होईल तेवढी अविरत सेवा करण्याचा आटोकाट प्रयत्न केला. या प्रयत्नांमधून निश्चितपणे मी समाधानी असून माझ्या नोकरीला मी पूर्ण न्याय देण्याचा प्रयत्न केला असून ग्रामसेवक सेवेमध्ये मी पूर्ण समाधानी राहिलेलो आहे.याबाबत अनेक मतमतांतरे असू शकतात परंतु मी स्वतः ग्रामविकास चळवळीला स्वतःला झोकून देऊन यशस्वी सेवा देण्याचा प्रयत्न केलेला आहे. या ३६ वर्षाच्या कालखंडामध्ये मी स्वतः अनेक चढ-उतार अनुभवलेले आहे.अनेक मित्र जोडलेले आहेत.समर्थांच्या कृपेने सर्वसमर्थ प्रपंच समर्थ ग्रामसेवक परिवार समर्थ नगर जिल्हा समर्थ संघटना आणि समर्थ विचार रुजवले आहेत.असे माझे व्यक्तीगत मत आहे. *माझ्या जवळून संपर्कात आले त्यांना माझी काम करण्याची पद्धत, हातोटी,कामाचा सपाटा हे त्यांचे सहकार्यानेच शक्य झाले आहे. एकमेकाबद्दलची आत्मीयता धार्मिक प्रवृत्ती संत विचार अंगीकारुन ग्रामविकास सेवा करत एकमेकांना मदत करत रहा असे सांगण्याचा मी मनोमन खूप प्रयत्न केलेला आहे.* आणि यामधून अनेक चांगले मित्र व  मैत्री निर्माण झालेली आहे यामुळे माझा पूर्ण दिवस समाधानी जातो.अशी माझी विचारधारा आहे सतत कामात व्यग्र असणे पॉझिटिव्हली सतत विचार करणे यामुळे ऊर्जा निर्माण होतेअसे माझे मत आहे. *राज्य ग्रामसेवक युनियनची ३० वर्ष अविरत सेवा जिल्हाध्यक्षपदाची निष्काम ३० वर्षे व ग्रामसेवक पतसंस्थेची पंचवीस वर्ष ग्रामसेवक यांना आर्थिक सुबत्ता निर्माण करण्यासाठी केलेले योगदान*  स्वामी समर्थ सेवेकरी म्हणून बजावलेले सेवा ग्रामसेवक प्रबोधन दिंडी द्वारे नगर जिल्ह्यात आणि महाराष्ट्रात अध्यात्मातून ग्रामविकास ग्रामसेवक वारकरी आणि माझा हरी ही संकल्पना दृढ करण्याचा केलेला छोटासा प्रयत्न यामधून समाजाला ग्रामसेवकाला कुटुंबाला मिळालेले आध्यात्मिक बळ,नैराश्य कमी होउन समाधानी राहून काम करने या सर्व बाबी उर्जा स्तोत्र म्हणून मी स्वतः अनुभवलेले आहे.

        राज्यस्तरावर राज्याध्यक्ष म्हणून काम करताना अनेक चांगले वाईट अनुभव आलेले आहेत. परंतु या पदाला न्याय देण्याचे काम ग्रामसेवक सक्षम करण्याचे काम ग्रामसेवकाचा स्वाभिमान जागृत ठेवण्याचे काम चळवळ शेवटच्या थरापर्यंत जागृत करण्याचे काम आणि *एकच ध्यास ग्रामसेवक विकास ही कामे प्रामुख्याने केलेली आहे काही प्रश्न सुटलेली आहेत आणि जरी काही प्रश्न सुटलेले नाहीत.मान्य आहे सगळे काही शक्य नाही.भविष्यात यावर निश्‍चितपणे संघर्षशील धोरण अवलंबून न्याय देण्याबाबत कठोर निर्णय घेतले जातील.पण ते आपल्या पाठिंब्यानेच, अशी माझी पक्की धारणा आहे.

       कोरोना च्या कालखंडात मी स्वतः आणि माझ्या संपूर्ण बांधवांनी जीव धोक्यात घालून खूप काम केलेले आहे. हा अनुभव पुढच्या पिढीला प्रेरणादायी सांगण्यासारखा आहे.ग्रामसेवकाची प्रतिमा महाराष्ट्रभर समाजात उजळून निघालेली आहे.यात तिळमात्र शंका नाही *आपले काही बांधव शहीद झालेले आहे.त्याबद्दल अतीव दुःख आहे.*मी माझ्या परीने समाजासाठी शैक्षणिक क्षेत्रात सुद्धा छोटासा कल्पवृक्ष लावण्याचा प्रयत्न केलेला आहे.त्याचा वटवृक्ष पाहण्याची इच्छा आहे.

   असो हे सर्व परमेश्वरी लीलया असून समर्थांच्या पांडुरंगाच्या हातात आहे. आपले प्रयत्न निश्चितपणे करणे गरजेचे आहे.असो या कालखंडात या अविरत सेवेची ३६ वर्ष या प्रवासात माझ्या कुटुंबाने माझ्या सहचारिणी माझ्या मित्रपरिवाराने आप्तेष्ट नातेवाईक यांनी अधिकारी पदाधिकारी यांनी मला जेष्ठ व योगदान दिलं यांचा मी सदैव ऋणी राहील. माझे प्रेरणा स्थान कैलास वाशी सुनिता धर्मपत्नी यांची आजही आठवण कायम स्मरणात राहते.एक दुःखद घटना सोडता माझ्या कुटुंबात परिवारात आनंददायी जीवन जगण्याचा मी संकल्प केला होता. तो माझ्या परीने पूर्ण करण्याचा प्रयत्न केलेला आहे.करीत राहील असा संकल्प या दिनी पुन्हा करीत आहे.परमेश्वराकडे सर्वांना सुखकारक मंगलमय जीवन लाभो अशी कामना करत आहे व *आपली सेवा यशस्वी सेवा आहे ती नोकरी अतिशय कर्तव्यनिष्ठा समजून आपल्या सर्वासाठीच करत राहील.अशी ग्वाही पुनश्च: देतो.*


       *जय हिंद जय महाराष्ट्र*

             *जय युनियन*✌️


        *सदैव आपलाच*

     एकनाथराव ढाकणे

             संगमनेर

      

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post