जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसलेंनी चालवला ट्रॅक्टर....निसर्गरम्य वातावरणात पर्यटनाचा आनंद

 साईबन’ एक नंदनवन- हुरडा संस्कृती पुढच्या पिढीपर्यंत पोहचणे आवश्यक -  जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले

 


 नगर - गुलाबी थंडीमध्ये हिरवागार मऊ लुसलुशीत हुरडा तोही शेतात जाऊन खाणे कुटुंबीयांसमवेत, मित्रांसमवेत त्याचा आनंद घेणे हा आनंदच सुखद व अवर्णनीय आहे. पिझ्झा बर्गरच्या झपाटयात सापडलेल्या पुढच्या पिढीला सावरले पाहिजे आणि ह्याचा एकदा अनुभव त्यांना दिला पाहिजे असे प्रतिपादन अहमदनगरच्या साईबन मध्ये हुरडा महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी मा. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी केले. डॉ. कांकरिया दांपत्याने स्वत: नेत्रतज्ञ डॉक्टर व्यावसायीक असून उजाड माळरानाला मोठया कष्टाने जिद्यीने एका हिरव्या स्वप्नात रूपांतरीत केले एक स्वर्गीय नंदनवन उभारले त्यांचे मी मनापासून अभिनंदन करतो. आज ह्या वर्षीचा पहिला हुरडा खायला मिळाला याचा मोठा आनंद वाटतो आहे. साईबन मध्ये आज हुरडा महोत्सवाचा प्रारंभ मा. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या शुभहस्ते हुरडा भट्टीचे पूजन व प्रज्वलन करून करण्यात आले.

 

 या प्रसंगी मा. जिल्हा पोलिस अधिक्षक श्री मनोज पाटील हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. त्यांनीही हुरडा पूजन करून साईबनच्या सर्वांगीन विकास पर्यावरण आध्यात्म व मनोरंजन याचा एक उत्तम समतोल असून नगरच नाही आजूबाजूच्या जिल्हयांनाही आदर्श उभा केला आहे असे प्रतिपादन केले. पद्मश्री पोपटरावजी पवार यांचा नुकत्याच दिल्ली येथे सन्मान घेऊन आल्या बद्दल विशेष सत्कार मा. जिल्हाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आला. ते म्हणाले डॉ. कांकरियांनी साईबनची सुरूवात केल्या पासून मी येथील सर्व गोष्टींचा एक साक्षीदार आहे त्याचप्रमाणे मी क्रिकेट खेळत असल्यापासून डॉ. कांकरियाची एक विशेष मैत्री निर्माण झाली होती. एक माणूस धाडसाने व ध्येयाने झपाटल्यावर काय करू शकतो याचे साईबन हे एक आदर्श उदाहरण आहे. ह्या कार्यक्रमात प्रसिद्ध चित्रकार व शिल्पकार श्री प्रमोद कांबळे यांचा आयोध्येत रामजन्मभूमी साकार करण्यामध्ये मिळालेल्या योगदाना बद्दल रोटरीचे उपप्रांतपाल श्री दादासाहेब करंजूले यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला तर जैन कॉनफरन्सचे श्री सतीश लोढा यांचा सन्मान सी ए श्री प्रसाद भंडारी यांच्या हस्ते करण्यात आला. या प्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी ट्रक्टर चालविण्याचा आनंद लुटला. पपेट शो, प्राणी, पक्षी, नक्षत्र उदयान, बैलगाडी सफर, रोप-वे, बोटिंग, ट्रक्टर सफर, बैलगाडी सफर, अंतराळाची सफर आदींचे सुंदर नियोजन पाहून उपस्थितांनी या उपक्रमाचे कौतुक केले.

 सदर कार्यक्रमाला महावीर इंटरनॅशनलचे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्री रमेश बाफना, रोटरीचे अध्यक्ष श्री प्रशांत बोगावत, बिल्डर्स असो.चे श्री जवाहर मुथ्था, श्री जनकशेट आहुजा (पंंजाब समाज लंगर सेवा) आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे स्वागत डॉ. सौ सुधा कांकरिया यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार डॉ. प्रकाश कांकरिया यांनी केले.

  साईबनमध्ये हुरडा महोत्सवाचा प्रारंभ झाला असून यामध्ये अतिशय आकर्षक गोष्टींचा समावेश केला असून संपूर्ण दिवस आपल्या कुटुंबियांसमवेत व मित्रांसमवेत आनंदात घालवू शकता या बद्दल श्री सतिश शिंदे व श्री शेवाळे यांना संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले. संपर्कासाठी नंबर ९११२२८८६२२ किंवा ९८५०५००९०५


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post