विधान परिषद निवडणूक...कॉंग्रेसची विनंती भाजपला मान्य...उमेदवाराची माघार..

 

विधान परिषद निवडणूक...कॉंग्रेसची विनंती भाजपला मान्य...उमेदवाराची माघार..कोल्हापूरः आमदार शरद रणपिसे यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या विधान परिषदेच्या जागेसाठी काँग्रेसकडून दिवंगत राजीव सातव यांच्या पत्नी प्रज्ञा सातव यांना उमेदवारी देण्यात आली आहे. ही निवड बिनविरोध व्हावी यासाठी काँग्रेस प्रयत्नशील असतानाच भाजपनं आपला उमेदवारी अर्ज माघारी घेतला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील  यांनी आज ही घोषणा केली आहे. 

चंद्रकांत पाटील हे आज कोल्हापुरात आहेत. कोल्हापुरात आज चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत विधान परिषद निवडणुकीसाठी अमल महाडिक यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यावेळी ते बोलत असताना त्यांनी प्रज्ञा सातव यांच्या निवडीबाबतही भाष्य केलं आहे. 


सातव यांच्या घरात उमेदवारी गेली त्यामुळं आम्ही आमचा अर्ज आज मागे घेत आहोत. प्रज्ञा सातव यांना राज्यसभेची उमेदवारी मिळावी असा आमचा आग्रह होता. सातव यांच्या पत्नीला उमेदवारी मिळायला हवी ती किमान आता विधान परिषदेला मिळाली आहे, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. तसंच, प्रज्ञा सातव यांच्या बिनविरोध निवडीसाठी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात व नाना पटोले यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती, असंही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post