नगर तालुक्यात जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी अनेक जण इच्छुक

नगर तालुक्यात जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी अनेक जण इच्छुकनगर तालुका- नगर तालुक्यातील जेऊर गणातुन गणेश आवारे यांनी पंचायत समितीची निवडणूक लढविण्याचे रणसिंग फुंकल्याने जेऊर गणातील निवडणुकीतील चुरस वाढणार आहे.

      गणेश आवारे मित्रमंडळाच्या माध्यमातून सामाजिक, धार्मिक तसेच शैक्षणिक क्षेत्रात नेहमीच मदतीसाठी पुढाकार घेणाऱ्या गणेश आवारे यांनी पंचायत समितीची निवडणूक लढविण्यास इच्छुक असल्याचे जाहीर केल्याने विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. गणेश आवारे यांचा गणातील दांडगा संपर्क तसेच पाठीशी असलेली तरुणांची मोठी फळी यामुळे निवडणूकीतील रंगत वाढणार आहे. 

        गणेश आवारे गणातील प्रत्येक गावात विविध धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक कार्यक्रमांना नेहमीच मदत करत असल्याने गणातील मोठा गट त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार हे सत्य नाकारता येणार नाही. गेल्या १० वर्षांपासून समाजसेवेचे व्रत अंगिकारल्याने तरुणांची मोठी फळी गणेश आवारे यांच्या पाठीशी आहे. तरुणांचे केलेले संघटन अन् सदैव मदत करण्यास पुढाकार घेणाऱ्या आवारे यांनी निवडणूक लढविण्यास दुजोरा दिल्याने राजकीय चर्चेला उधाण आले आहे.

सामाजिक कार्याचा होणार फायदा गणेश आवारे यांनी मित्र मंडळाच्या माध्यमातून आजपर्यंत अनेक मंदिरे, शाळा तसेच गोरगरीबांना मदत करण्याचे कार्य केलेले आहे. विविध प्रकारच्या धार्मिक, शैक्षणिक कार्यक्रमांना आर्थिक मदत केली आहे. त्यांच्या या कार्याची निवडणुकीत मदत होईल व गणेश आवारे यांचा विजय निश्चित होणार असल्याचा विश्वास त्यांच्या समर्थकांकडुन करण्यात येत आहे.

प्रत्येक गावात मित्र परिवा जेऊर पंचायत समितीच्या गणातील प्रत्येक गावात गणेश आवारे यांचा दांडगा संपर्क असून प्रत्येक गावात मोठ्या प्रमाणात मित्र परिवार आहे. गणेश आवारे यांच्या सामाजिक कार्यामुळे प्रत्येक गावात त्यांची प्रतिमा चांगली असून निवडणुकीत याचा फायदा आवारे यांना होवु शकतो.

राजकारण विरहित मैत्रीपूर्ण संबंध पंचायत समिती गणातील सर्व गावचे सरपंच तसेच विविध पदाधिकारी यांच्याशी गणेश आवारे यांचा राजकारण विरहित वैयक्तिक मैत्रीपूर्ण संबंध आहेत. त्यामुळे निवडणुकीत राजकारण विरहित मैत्रीपूर्ण संबंधाचा फायदा होण्याची लक्षणे दिसून येतात.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post