पंकजाताईंकडून भाऊबीजेच्या शुभेच्छा मिळाल्या? बंधू धनंजय मुंडे म्हणाले...

 

पंकजाताईंकडून भाऊबीजेच्या शुभेच्छा मिळाल्या? बंधू धनंजय मुंडे म्हणाले ‌‌....बारामती : आमचे जे शक्तीपीठ आहे, त्या शक्तीपीठावर घाव घालून भारतीय जनता पक्षाला आणि त्यांच्या विचारधारेच्या लोकांना असं वाटत असेल की आपल्याला काहीतरी यश मिळाले. पण, त्यांनी असे कितीही प्रयत्न केले तरी हे भारतीय जनता पक्षाला ह्या महाराष्ट्राच्या माती गाडल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, अशा शब्दांत सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी भाजपवर हल्लाबोल केला. 

दिवाळी पाडव्याच्या निमित्ताने मंत्री धनंजय मुंडे हे शरद पवार यांना भेटण्यासाठी बारामतीत आले होते. मुंडे यांनी शरद पवार यांच्या गोविंदबाग या निवासस्थानी जाऊन त्यांना पाडव्याच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी वरील इशारा दिला. 

भारतीय जनता पक्षाच्या नेत्या, माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी भाऊबीजेच्या शुभेच्छा दिल्या नसल्याचेदेखील मुंडे यांनी स्पष्ट केले. ज्या वेळी शुभेच्छा मिळतील, त्या वेळी आपल्याला कळवले जाईल, अशी मिश्किल टिप्पणी सामाजिक न्यायमंत्री असलेल्या धनंजय मुंडे यांनी केली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post