बायोडिझेल विक्री प्रकरण... शिवसेनेचे शहरप्रमुख दिलीप सातपुते यांना पदावरून डच्चू

 बायोडिझेल विक्री प्रकरण... शिवसेनेचे शहरप्रमुख दिलीप सातपुते यांना पदावरून डच्चू



अहमदनगर-नगर येथील बहुचर्चित बेकायदेशीर बायोडिझेल विक्री प्रकरणात शिवसेनेचे शहरप्रमुख दिलीप सातपुते यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर शिवसेनेने वरिष्ठ पातळीवर  गंभीर दखल घेतली आहे.  दिलीप सातपुते यांच्या पदाला तत्काळ स्थगिती दिली आहे.  शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या  सामनातून अधिकृतपणे वृत्त प्रसिद्ध करण्यात आले आहे. नवीन शहर प्रमुखाची नियुक्ती लवकरच केली जाईल, असेही शिवसेनेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

दरम्यान कोतवाली पोलिस ठाण्यात बायोडिझेल प्रकरणी गुन्हा दाखल आहे. यात 22 आरोपी निष्पन्न झाले आहेत. त्यातशिवसेनेचे  दिलीप सातपुते यांचाही समावेश करण्यात आला आहे. सातपुते सध्या पसार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

दुसरीकडे गुन्हा दाखल होताच शिवसेनेकडून सातपुते यांच्यावर पक्षाने कारवाईचा बडगा उगारला आहे. नगर शहर शिवसेनाप्रमुख दिलीप सातपुते यांच्या पदाला स्थगिती देण्यात आल्याबाबत शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयाकडून अधिकृतपणे जाहीर करण्यात आल्याची माहिती आहे.  सामनातून याबाबत अधिकृतपणे वृत्त प्रसिद्ध करण्यात आले आहे. नवीन शहर प्रमुख पदाची नियुक्ती लवकरच केली जाईल, असेही या वृत्तामध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post