जिल्हा रूग्णालय अग्निकांड...नगरमधील खासगी हॉस्पिटल उद्या बंद

 नगरमधील खासगी हॉस्पिटल उद्या बंदनगर : जिल्हा रुग्णालयातील आगीच्या घटना रोखण्यासाठी राज्यातील प्रत्येक सरकारी रुग्णालयांमध्ये आग प्रतिबंधक यंत्रणा बसवावी आणि आगीच्या घटनेत जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व परिचारिका यांच्यावर झालेल्या कारवाईचा निषेध नोंदविण्यासाठी इंडियन मेडिकल असोसिएशनच्या अहमदनगर शाखेने उद्या, गुरुवार बंद पुकारला आहे. इंडियन मेडिकल असोसिएशन राज्यस्तरावर निषेध नोंदविण्यासाठी लवकरच निर्णय घेणार असल्याची माहिती अहमदनगर शाखेचे अध्यक्ष डॉ. अनिल आठरे यांनी यावेळी दिली.
असोसिएशनचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. डॉ. बापूसाहेब कांडेकर, डॉ. एस. एस. दीपक, डॉ. पारस कोठारी, डॉ. जयदीप देशमुख आदी उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post