जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकीचा बिगुल,प्रारूप मतदारसंघ रचना तयार करण्याचे आदेश

जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकीचा बिगुल वाजला; निवडणुकीसाठी प्रारूप मतदारसंघ रचना तयार करण्याचे आदेश अहमदनगर - पुढीलवर्षी सन २०२२ च्या फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी मतदारसंघ रचनेचे प्रारूप तयार करण्याबाबतचे आदेश शुक्रवारी (दि.१९) सायंकाळी राज्य निवडणूक आयोगाने जारी केले. येत्या ३० नोव्हेंबरअखेर हे काम पूर्ण करावे, असे आदेश राज्यातील जिल्हाधिकाऱ्‍यांना दिले. या आदेशाच्या निमित्ताने राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती या निवडणुकांचे बिगुल वाजले आहे

राज्यातील मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, धुळे, नंदुरबार, अकोला, वाशिम, भंडारा, गोंदिया आणि नागपूर हे जिल्हे वगळता अन्य सर्व जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक होणार आहे. नगर जिल्ह्यात ७५ जिल्हा परिषद गट आणि १५० पंचायत समिती गणांसाठी फेब्रुवारीत रणांगण रंगणार आहे. या निवडणुकीची तयारी सर्वच पक्षांकडून गेल्या सहा महिन्यांपासून जोरदारपणे सुरू असून, विविध पक्षांतील मातब्बरांना आपल्या पक्षात आणण्याची रस्सीखेच सुरू आहे. www.mazamaharashtra.com

कोरोना संकटाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा परिषदांच्या निवडणुका लांबणीवर पडतील की काय, अशी एक शंका उपस्थित केली जात होती, परंतु निवडणूक आयोगाने वेळेतच निवडणुका होतील, असे संकेत या आदेशातून दिले आहेत. www.mazamaharashtra.com

२०११ च्या जनगणनेच्या आधारे रचना करायची असल्यामुळे चालू मतदारसंघ संख्येमध्ये बदल होणार नाही, अशीच शक्यता आहे. राज्य निवडणूक आयोगाचे उपायुक्त अविनाश सणस यांनी काढलेल्या आदेशात ३० नोव्हेंबरपूर्वी प्रभागरचना तयार करण्यात यावी, असे म्हटले आहे. प्रभागरचना आणि आरक्षण सोडतीची कार्यवाही करण्यासाठी लागणारा कालावधी लक्षात घेता निवडणुका या मुदत समाप्तीपूर्वी पार पडणे आवश्यक आहे, असेही त्यांनी आदेशात म्हटले आहे.www.mazamaharashtra.com

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post