योगींना पंतप्रधान मोदींनी काय सांगितले? अखेर समोर आला मोठा खुलासा....

 

योगींना पंतप्रधान मोदींनी काय सांगितले? अखेर समोर आला मोठा खुलासा....नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या खांद्यावर हात ठेवून चालत आहेत, असे दोन फोटो सोशल मिडीयावर वायरल झाले होते. त्या फोटोंमध्ये योगी आणि मोदींमध्ये काही गहन चर्चा सुरू आहे, असं दिसते. मात्र, पंतप्रधान मोदी आदित्यनाथ यांना नेमके काय बोलत आसावेत? असा प्रश्न सोशल मिडीयावर सतत विचारला जातोय आणि नेटकरी आपले तर्क-वितर्क लावत आहेत. पण आता संरक्षण मंत्री आणि भाजपचे लखनौचे खासदार राजनाथ सिंह यांनी हे रहस्य उघड केले आहे.

गुरुवारी ट्विटकरत सिंह म्हणाले की, “लोकं विचारात पडले आहेत की यूपीच्या मुख्यमंत्र्यांना पंतप्रधान नेमके काय बोलत होते? तर, पीएम म्हणत होते की योगी एका दिग्गज क्रिकेटपटूप्रमाणे फलंदाजी करत आहेत आणि त्यांनी त्यांची कामगिरी अशीच चालू ठेवावी, ज्यामुळे भाजपला विजय मिळवायला मदत होईल.”0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post