२०२४ ला शिवसेना पुन्हा....खा.ओवेसींनी वर्तवले मोठं भाकीत...

 २०२४ ला शिवसेना पुन्हा....खा.ओवेसींनी वर्तवले मोठं भाकीत...सोलापूर: एमआयएम पक्षाचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी  सोलापूर दौऱ्यावर होते. त्यांनी आज माध्यमांशी बोलताना राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीकास्त्र डागलं आहे. शिवसेनेच्या भूमिकेविषयी भाकित करताना त्यांनी शिवसेनेच्या भूमिकेवर अविश्वास देखील व्यक्त केला आहे. तसेच 2024 साली शिवसेनेची काय भूमिका असेल, याबाबत त्यांनी भाकित देखील वर्तवलं आहे.

 2024 ला तुम्ही बघा, शिवसेना पुन्हा भाजपासोबत जाईल, असं थेट भाकित देखील ओवैसींनी वर्तवलं आहे.

पुढे राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका करताना त्यांनी म्हटलंय की, याच विषयावर राष्ट्रवादीला बोलायला सांगा. पुढे ते म्हणाले की, जेंव्हा आम्ही निवडणूक लढवायला आलो तेंव्हा हे म्हणायला लागले की तुम्ही मतांची विभागणी करत आहात. आम्ही मतांची मागणी केली तर तुम्ही आम्हाला जातीयवादी म्हणता आणि दुसरीकडे तुम्हीच शिवसेनेला सत्ता दिली आहे. त्यांना मुख्यमंत्रीपद दिलंय. तुम्ही प्रत्येक गोष्टीवर बोलू शकता, मात्र आम्ही नाही? तुम्ही धर्मनिरपेक्षतेचा ठेका घेतलाय का? असं देखील ओवैसी म्हणाले आहेत.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post