पारनेर मध्ये आ.लंकेंच्या वर्चस्वाला आव्हान देण्यासाठी मंत्री शंकरराव गडाख उतरले मैदानात....

 पारनेर मध्ये आ.लंकेंच्या वर्चस्वाला आव्हान देण्यासाठी मंत्री शंकरराव गडाख उतरले मैदानात....नगर:  शिवसेना पक्ष वाढीसाठी, युवकांचे संघटन करून शिवसेना पक्ष संघटना बळकट करण्यासाठी पारनेर तालुका शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक यांचा मनकर्णिका मंगल कार्यालय पारनेर येथे मेळावा घेण्यात आला.

यावेळी जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी

पारनेर शिवसेना पदाधिकारीव शिवसैनिक, विविध गावातील ग्रामस्थ यांच्या भेटी घेऊन त्यांच्याशी विविध विषयांवर चर्चा  करून त्यांच्या समस्या समजून घेऊन त्या सोडविण्यासाठी संबंधितास सूचना दिल्या.त्यांचे निवेदने स्वीकारून त्यांचे प्रश्न मार्गी लावण्याबाबत आश्वासन दिले.

जलसंधारण विभागा अंतर्गत येणारे पारनेर तालुक्यातील अनेक बंधारे नादुरुस्त झाले आहेत तसेच अनेकांची दुरुस्ती करणे आवश्यक आहे तरी मुख्यमंत्री जलसंवर्धन योजनेअंतर्गत पारनेर तालुक्यातील जास्तीत जास्त बंधारे दुरुस्ती केले जातील तसेच नवीन बंधारे देण्याचा माझा प्रयन्त राहील. 

यावेळी विधानसभा माजी उपाध्यक्ष विजयराव औटी, शिवसेना पक्षाचे संपर्क प्रमुख भाऊ कोरगावकर,जिल्हा प्रमुख प्रा शशिकांत गाडे सर,अहमदनगर जिल्हा परिषदेचे कृषी व बांधकाम समिती सभापती काशिनाथ दाते सर,प.स. सभापती गणेश शेळके,उपजिल्हाप्रमुख रामदास भोसले,तालुका प्रमुख विकास रोहकले, महिला तालुका प्रमुख प्रियांका खिलारी यांच्यासह विविध गावागावातील शिवसेना पक्ष पदाधिकारी, शिवसैनिक व सरपंच, उपसरपंच व ग्रामस्थ उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post