नगर जिल्ह्यात जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांचे बिगुल वाजले... निवडणूक आयोगाने दिले महत्त्वपूर्ण आदेश


नगर जिल्ह्यात जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांचे बिगुल वाजले... निवडणूक आयोगाने दिले महत्त्वपूर्ण आदेश



नगर: आगामी फेब्रुवारी महिन्यात होणार्‍या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी मतदारसंघ रचनेचे प्रारूप तयार करण्याचे आदेश  राज्य निवडणूक आयोगाने जारी केले. येत्या 30 नोव्हेंबर अखेर हे काम पूर्ण करण्याचे आदेश राज्यातील जिल्हाधिकार्‍यांना दिले. या आदेशाच्या निमित्ताने राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती या निवडणुकांचे बिगूल वाजले आहे.


राज्यातील मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, धुळे, नंदुरबार, अकोला, वाशिम, भंडारा, गोंदिया आणि नागपूर हे जिल्हे वगळता अन्य सर्व जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक होणार आहे. नगर जिल्ह्यात 75 जिल्हा परिषद गट आणि 150 पंचायत समिती गणासाठी फेब्रुवारीत रणांगण रंगणार आहे. 

2011 च्या जनगणनेच्या आधारे रचना करायची असल्यामुळे चालू मतदारसंघ संख्येमध्ये बदल होणार नाही, अशीच शक्यता आहे. 

राज्य निवडणूक आयोगाचे उपायुक्त अविनाश सणस यांनी काढलेल्या आदेशात 30 नोव्हेंबरपूर्वी प्रभागरचना तयार करण्यात यावी, असे म्हटले आहे. प्रभागरचना आणि आरक्षण सोडतीची कार्यवाही करण्यासाठी लागणारा कालावधी लक्षात घेता निवडणुका या मुदत समाप्तीपूर्वी पार पडणे आवश्यक आहे, असेही त्यांनी आदेशात म्हटले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post