नगर शहरात वाढदिवसाचा फ्लेक्स लावताना विजेचा धक्का बसून तरुणाचा मृत्यू

 नगर मध्ये वाढदिवसाचा फ्लेक्स लावताना विजेचा धक्का बसून युवकाचा मृत्यू

अहमदनगर -वाढदिवसाचा फ्लेक्स बोर्ड लावत असताना एका युवकाला विजेचा धक्का बसला असून यात त्याचा मृत्यू झाला. सौरभ सुरेश चौरे (वय २२, रा. नालेगाव) असे मृत युवकाचे नाव आहे. सावेडी उपनगरातील प्रोफेसर काॅलनी चौकात गुरुवारी (दि.२५) पहाटे ही घटना घडली.

सौरभ चौरे हा युवक फ्लेक्स बोर्ड लोखंडी कमानीला चिकटवणे, त्या उभ्या करणे, मोठ मोठे बनर लावणे आदी कामे करत होता. गुरुवारी पहाटे प्रोफेसर कॉलनी चौकात वाढदिवसाचे फ्लेक्स लावत असताना त्याला विजेचा धक्का लागला. यामुळे तो जमिनीवर कोसळला. त्याच्या डोक्याला मार लागला होता. जखमी सौरभला उपचारासाठी तत्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचारापूर्वीच त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. या प्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्याच्या पश्चात आई, वडील, एक भाऊ व एक विवाहित बहिण असा परिवार आहे. मयत सौरभ वर नालेगावच्या अमरधाम स्मशानभूमीत दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post