आ.लंकेंचे कामच दमदार.... दिवाळीनिमित्त भूमीपुत्र प्रशासकीय अधिकार्यांचा सन्मान

 

आ.लंकेंचे कामच दमदार.... दिवाळीनिमित्त भूमीपुत्र प्रशासकीय अधिकार्यांचा सन्मानपारनेर - नगर विधानसभा मतदार संघातील भूमिपुत्र प्रशासकीय अधिकारी यांचा स्नेह मेळावा आज पारनेर येथे पार पडला. यावेळी तालुक्यातील जवळपास 125 अधिकारी उपस्थित होते तर काही अधिकारी उपस्थित होऊ शकले नाहीत. ते पुढील वर्षीच्या स्नेह मेळाव्यास उपस्थित राहणार आहेत. असा स्नेह मेळावा दर वर्षी भाऊबीजेच्या दिवशी आयोजित केला जाणार असून दर वर्षी अश्या अधिकाऱ्यांची संख्या वाढविण्यावर भर राहणार असून यासाठी मतदार संघातील अधिकारी मार्गदर्शन व मदत करणार आहेत. 

तालुक्यातील आज सचिव पदापर्यंत अधिकारी आहेत. उच्च पदावर असूनही त्यांचे पाय अजूनही जमिनीवरच आहेत व मायभूमी प्रति त्यांची आत्मीयता व मायभूमी साठी काहीतरी करण्याची धडपड पाहून त्यांचा अभिमान वाटला. 

मतदार संघातील अश्या अधिकाऱ्यांचा मदतीने व सहकार्याने मोठे शैक्षणिक काम उभे राहणार आहे अशी भावना आ.निलेश लंके यांनी यानिमित्त व्यक्त केली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post