मोठी बातमी...विधानपरिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर...नगर मतदारसंघाबाबत मोठा निर्णय

 मोठी बातमी...विधानपरिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर...नगर मतदारसंघाबाबत मोठा निर्णयमुंबई : राज्यातील विधानपरिषदेच्या रिक्त होणार्‍या सहा जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. यात मुंबई स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील दोन जागांसह कोल्हापूर, धुळे-नंदूरबार, अकोला-बुलढाणा-वाशिम आणि नागपूर या मतदारसंघांचा समावेश आहे. याठिकाणी 16 नोव्हेंबर रोजी अधिसूचना जारी होणार असून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी 23 नोव्हेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. 10 डिसेंबर 2021 रोजी मतदान आणि 14 डिसेंबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. 

नगर स्थानिक स्वराज्य मतदारसंघातही याच काळात निवडणूक होणे अपेक्षित होते. परंतु, नगरमध्ये सध्या काही स्थानिक स्वराज्य संस्थांची मुदत संपलेली असल्याने नियमानुसार 75 टक्क्यापेक्षा अधिक पात्र मतदार नाहीत. त्यामुळे नगर तसेच सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील निवडणूक तूर्तास पुढे गेल्याचे स्पष्ट झाले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post