गाडे सरांसाठी उध्दव ठाकरेंकडे शिफारस करणार...मंत्री उदय सामंत यांची ग्वाही

 गाडे सरांसाठी उध्दव ठाकरेंकडे शिफारस करणार...मंत्री उदय सामंत यांची ग्वाहीनगर -युवकांना रोजगार उपलब्ध करण्यासाठी तसेच उद्योगधंदे सुरू करण्यासाठी अहमदनगर येथे प्राध्यापक शशिकांत गाडे यांच्या वाढदिवसानिमित्त तीस कोटी रुपये खर्चाचे सेंटर ऑफ एक्सलन्स इन्स्टिट्यूट उभे करणार. शासकीय तंत्रनिकेतन येथील दोन एकर जागेमध्ये हे उभे करणार आहे. अहमदनगर येथील शासकीय तंत्रनिकेतन मधील सतरा एकर पैकी दोन एकर जागा जागेमध्ये आहे इन्स्टिट्यूट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली उभारणार एकतीस मार्च नंतर होणाऱ्या पहिल्या एम एस बी टी च्या मिटिगमध्ये याबाबत ठराव घेणार असल्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी यावेळी सांगितले. 

 नगर येथे युवा सैनिकांचा मेळावा व बैठक तसेच 83 युवा सैनिकांना नियुक्तीचे पत्र देण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमासाठी जिल्हा प्रमुख प्राध्यापक शशिकांत गाडे, संपर्क प्रमुख भाऊ कोरेगावकर, माजी महापौर भगवान फुलसौंदर, शहरप्रमुख संभाजी कदम, सभापती सुरेखा गुंड उपसभापती डॉक्टर दिलीप पवार ,प्रवीण कोकाटे, संदीप गुंड, विलास शेडाळे , तालुका प्रमुख राजेंद्र भगत ,      युवा सेना अध्यक्ष प्राविण गोरे ,प्रकाश कुलट, व्ही. डि. काळे, योगेश लांडगे , संभाजी भगत , रामदास भोर, शरद झोडगे , गोविद मोकाटे , गुलाब शिंदे यावेळी उपस्थित होते .  

 गाडे सरांनी हाल हापेष्ठा सहन करत पक्ष वाढवला , विरोधकांना नमवले. त्याच्यासाठी उध्दव ठाकरे यांच्याकडे नक्कीच शिफारस करणार . माझा व भाऊ कोरेगावकर याचा नेहमीच  उद्धव सोहबाशी संपर्क असतोय. याबाबत आम्ही दोघे चर्चा करणार असल्याचे सांमत यांनी यावेळी सांगीतले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post