कॉंग्रेसचा मोठा निर्णय...३ मंत्र्यांचे राजीनामे...नवीन मंत्री घेणार शपथ


कॉंग्रेसचा मोठा निर्णय...३ मंत्र्यांचे राजीनामे...नवीन मंत्री घेणार शपथ नवी दिल्ली : राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट  यांच्यातील वादावर तोडगा निघाला आहे. राजस्थानमधील मंत्रिमंडळ विस्ताराचा तिढा सुटला असून, पायलट समर्थकांना मंत्रिमंडळात स्थान मिळणार आहे. यासाठी तीन विद्यमान मंत्र्यांनी राजीनामा दिला असून, त्याजागी पायलट समर्थकांची वर्णी लागणार आहे. उद्या  सायंकाळी 4 वाजता मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे.

गेहलोत यांनी मंत्रिमंडळाची तातडीने बैठक आज सायंकाळी 5 वाजता बोलावली आहे. पक्षाचे प्रभारी अजय माकन हेसुद्धा जयपूरमध्ये दाखल झाले आहेत. शिक्षणमंत्री व प्रदेशाध्यक्ष गोविंदसिंह डोटासरा, महसूलमंत्री व पंजाब प्रभारी हरीश चौधरी आणि आरोग्यमंत्री रघू शर्मा यांनी राजीनामा दिल्याचे समजते. एक पद, एक व्यक्ती या तत्वानुसार हे राजीनामे घेण्यात आले आहेत. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post