ज्येष्ठ नेते शरद पवार रविवारी नगर जिल्ह्यात.... विधानपरिषद निवडणुकीची रणनीती ठरण्याची शक्यता

 

ज्येष्ठ नेते शरद पवार रविवारी नगर जिल्ह्यात.... विधानपरिषद निवडणुकीची रणनीती ठरण्याची शक्यतानगर: सहकारातील ज्येष्ठ नेते दिवंगत शिवाजीराव नागवडे यांच्या स्मृती स्मारकाचे लोकार्पण रविवार दिनांक ७ नोव्हेंबर रोजी होणार आहे. या कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार उपस्थित राहणार आहेत. पवारांच्या या दौऱ्यात विधानपरिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ निवडणुकीसाठी रणनिती निश्चित केली जाण्याची शक्यता आहे. या मतदारसंघांतील निवडणुकीसाठी याच महिन्यात आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेल्या या जागेसाठी यंदा भाजपकडून जोर लावला जात आहे. त्यामुळे महाविकास आघाडी एकसंघ ठेऊन भाजपाचे मनसुबे उधळून लावण्याचे आव्हान आघाडी समोर आहे. सध्या भाजपमध्ये असलेले माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले या जागेवर उमेदवारी करण्याच्या तयारीत आहेत. यासाठी ऐनवेळी ते राष्ट्रवादीचे घड्याळ बांधतील अशीही चर्चा आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीकडून माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील यांनीही मोर्चेबांधणी सुरू केली आहे. विद्यमान आमदार अरूणकाका जगताप यांचीही भूमिका पवारांच्या दौऱ्यात स्पष्ट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शरद पवारांचा हा दौरा जिल्ह्याच्या राजकारणाच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जात आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post