काळया बाजारात रेशनचा तांदुळ विक्रीसाठी चाललेला टेम्पोसह ९ लाखाचा मुद्देमाल जप्त

.

काळाबाजारात चाललेला रेशनचा ५ हजार ८७८ किलो तांदुळ पोलिसांनी पकडला आयशर टेम्पोसह ९ लाखाचा मुद्देमाल जप्त ,श्रीगोंदा पोलीस स्टेशन मध्ये दोघांविरोधात गुन्हा दाखल.अहमदनगर- प्रतिनिधी विक्रम बनकर श्रीगोंदा तालुक्यातील पारगांव सुद्रीक या ठिकाणी श्रीगोंदा पोलिसांनी काळया बाजारात विक्रीसाठी जाणारा १ लाख ७६ हजार ३६७ रुपयांचा ११९ गोण्यातील ५ हजार ८७८ किलो रेशनचा तांदूळ तसेच ७ लाख रुपये किमतीचा आयशर टेम्पो क्र.एम.एच १२ एच.डी २७२७ असा एकूण ८ लाख ७६ हजार ३६७ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असुन या प्रकरणी श्रीगोंदा पोलिस ठाण्यात पोलिस कॉन्स्टेबल आमोल आजबे यांच्या फिर्यादीवरून टेम्पो मालक महावीर वसंतलाल गांधी, रा. पारगांव सुद्रिक आणि चालक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून कारवाई वेळी अंधाराचा फायदा घेत टेम्पो चालक फरार झाला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. 

जिल्हा पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक, उपअधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीगोंदा पोलीस निरीक्षक रामराव ढिकले, दिलीप तेजनकर हे करत पुढील तपास करत आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post