जिल्हा रूग्णालय अग्निकांड...जिल्हा शल्य चिकित्सक अडचणीत, पालकमंत्र्यांनी केली मोठी घोषणा

 जिल्हा रूग्णालय अग्निकांड...जिल्हा शल्य चिकित्सक अडचणीत, पालकमंत्र्यांनी केली मोठी घोषणा



नगर : नगर जिल्हा रूग्णालयाला लागलेल्या आगीप्रकरणी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.पोखरणा यांच्यावर कारवाईचे संकेत मिळत आहेत. आज पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पोखरणा यांच्यावर कारवाई करण्याचा ठराव करण्यात आला. जिल्हा रुग्णालयाला लागलेल्या आगी संदर्भात आता जिल्हा शल्यचिकित्सक पोखरणा त्यांच्यावर कारवाई होणार असून त्यांच्यावर निलंबनाची अथवा सक्तीच्या रजेवर पाठवण्याची कारवाई करण्याचा ठराव जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे. ठराव घेऊन आरोग्य मंत्र्यांकडे पाठवण्यात आला असल्याची माहिती  पालकमंत्री हसन मुश्रीफ त्यांनी दिली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post