उपांत्य फेरीच्या आशा पल्लवीत....भारताचा स्कॉटलंडवर दणदणीत विजय

 उपांत्य फेरीच्या आशा पल्लवीत....भारताचा स्कॉटलंडवर दणदणीत विजयटीम इंडियाने टी20 विश्वचषकातील  पहिले दोन सामने गमावल्यानंतर तिसऱ्या सामन्यात अफगाणिस्तानला  66 धावांनी मात देत पहिला-वहिला विजय मिळवला. पण त्याहून तगडा विजय आज भारताने स्कॉटंलडला .8 गडी राखून पराभूत करत मिळवला आहे. विशेष म्हणजे भारताने स्कॉटलंडला दिलेलं लक्ष्य केवळ 39 चेंडूत पूर्ण केल्याने गुणतालिकेतही भारत नेटरनेटमध्ये सर्वांच्या पुढे गेला आहे. पण केवळ 2 विजय खात्यात असल्याने तिसऱ्या स्थानावर सध्यातरी भारत आहे.

पहिल्या सामन्यात पाकिस्तानने 10 आणि नंतर न्यूझीलंडने 8 विकेट्सनी मात दिल्यानंतर भारतासाठी नंतरचे सर्व सामने करो या मरो असेच होते. त्यानुसार तिसऱ्या सामन्यात अफगाणिस्तानला मात दिली. पण तरीही नेटरनरेटमध्ये पुढे जाण्यासाठी भारताला मोठ्या विजयाची अपेक्षा आहे. जी अपेक्षा आज उत्तम गोलंदाजी आणि नंतर फलंदाजीने भारताने पूर्ण केली आहे. आधी भेदक गोलंदाजीने भारताने स्कॉटलंडला 85 धावांमध्ये रोखलं. त्यानंतर सलामीवीर केएल राहुल आणि रोहित शर्मा यांनी उत्तम सुरुवात केली. रोहित, राहुल बाद होताच अवघ्या 4 धावांची गरज सूर्यकुमारने षटकार ठोकत पूर्ण करत अवघ्या 6.3 षटकात संघाला विजय मिळवून दिला.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post