अक्षय कर्डिलेंच्या घोषणेने नगर तालुक्यातील राजकारणात चर्चेला उधाण

 


अक्षय कर्डिलेंच्या घोषणेने नगर तालुक्यातील राजकारणात चर्चेला उधाणनगर : माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांचे सुपुत्र अक्षय कर्डिले यांनी आगामी जिल्हा परिषद निवडणुक लढवण्याची घोषणा करीत तालुक्यातील सहाही गट आपल्यासाठी सोपे असल्याचे सांगितले. कर्डिले यांची राजकारणातील ही एंट्री लक्षवेधी ठरणार आहे. नगर तालुक्यात जिल्हा परिषद गटात सध्या शिवसेना, कॉंग्रेस महाआघाडीचे वर्चस्व आहे. परंतु, स्वत: कर्डिलेंचे सुपुत्रच रिंगणात उतरणार असल्याने राजकारण मोठ्या प्रमाणात बदलण्याची शक्यता आहे. कर्डिले यांनी सहाही गट सोपे असल्याचे सांगत नेमक्या कोणत्या गटातून रिंगणात उतरणार हे स्पष्ट केलेले नाही. या सस्पेन्समुळे सर्वच गटातील विद्यमान सदस्यांची तसेच इच्छुकांची धाकधूक वाढली आहे. एकीकडे स्वत: माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले विधानपरिषदेची तयारी करत असताना त्यांचे सुपुत्र अक्षय कर्डिले जिल्हा परिषदेसाठी मोर्चेबांधणी करीत असल्याने येत्या काळात नगर तालुक्यातील राजकारण चांगलेच तापणार आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post