विद्याविहार सोसायटी मधील श्री दत्त मंदिरात दिपोत्सव आणि स्नेहमेळावा संपन्न

 विद्याविहार सोसायटी मधील श्री दत्त मंदिरात दिपोत्सव आणि स्नेहमेळावा  संपन्न .

 

अहमदनगर-दिल्लीगेट येथील विद्याविहार सोसायटी मध्ये त्रिपुरारी पौर्णिमा निमित्ताने  दिपोत्सव आणि स्नेहमेळावा मोठ्या भक्तिमय उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. सोसायटी मध्ये असलेल्या श्री दत्त मंदिरात सालाबाद प्रमाणे  सोसायटी च्या सर्व सभासदांनी सहकुटुंब दिवे लाऊन मंदिर लख्ख प्रकाशमय केले ,19 वर्षापुर्वी चंद्रकांत येंडे गुरुजी यांनी श्री दत्त मंदिराची स्थापना केली ,तेव्हापासून आजपर्यंत दरवर्षी गुरुजींच्या सुनबाई चित्रा येंडे यांनी त्रिपुरारी पोर्णिमा साजरी केली आहे , मागील वर्षी श्री दत्त मंदिराचा जिर्णोध्दार करण्यात आला  , सर्व भाविकांच्या सहभागातुन मंदिराची सुंदर इमारत उभी राहीली आहे , यंदाच्या वर्षी चित्रा येंडे यांना  दिपोत्सव साजरा करताना सोसायटी मधील युवक ,युवतींनी आपला सहभाग नोंदवत मदत केली , चित्रा येंडे आणि  देवयानी भोपे, यांच्या मार्गदर्शनाखाली प्रेषीता भोपे , विशाल येंडे, संभव काठेड , असीम भोपे, सचिन देशपांडे यांनी दिपोत्सव आणि  स्नेहमेळावा  यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले, या निमित्ताने सोसायटी मधील सर्व परिवार एकत्र आल्याने सोसायटी मधील सुख सुविधा संदर्भात चर्चा करण्यात आली ,या वेळी सर्वांच्या सुरक्षेच्या दृष्टिने  सोसायटीच्या  खर्चाने मंजुर करण्यात आलेले  सी सी टिव्ही बसवण्यात आले.या कार्यक्रमास सोसायटी च्या चेअरमन जयश्री भालेराव, सेक्रेटरी शैलेश कुलकर्णी तसेच चंद्रशेखर भालेराव, राजेंद्र येंडे आणि सर्व सभासद सहकुटुंब उपस्थित होते. उपस्थित सर्वांनी स्नेह भोजनाचा आस्वाद घेतला. स्नेहमेळावा समारोप प्रसंगी चित्रा येंडे यांनी उपस्थितांचे आभार मानले. श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पसायदानाने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post