बावनकुळे, तावडे यांचे पक्षाकडून पुनर्वसन... पंकजा मुंडेंबाबत प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणतात....

 बावनकुळे, तावडे यांचे पक्षाकडून पुनर्वसन... पंकजा मुंडेंबाबत प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणतात....पुणे : फाटक्या माणसासमोर नतमस्तक होईल, पण पदासाठी हात फैलावणार नाही, असे विधान पंकजा मुंडे यांनी जाहीर सभेत केले. विधानपरिषदेवर संधी न दिल्यामुळे त्या असे बोलल्या असा कयास बांधण्यात येतोय. पंकजा मुंडे यांच्या याच नाराजीवर आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी स्पष्टीकरण दिलंय. पंकजा मुंडेंबाबत चुकीचे अर्थ लावण्याचे कारण नाही. चंद्रशेखर बावनकुळेंना दोन वर्षानंतर मिळालं. संघटनेची जबाबदारी आम्ही जास्त महत्वाची मानतो,  असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय. ते पुण्यात बोलत होते.

भाजप नेते विनोद तावडे आणि मी एकत्र काम केलंय. जेव्हा त्यांना तिकीट नाकारलं तेव्हा वेगळ्या चर्चा झाल्या. मात्र जे संयम ठेवतात रिअॅक्ट होत नाहीत त्यांना चांगली संधी मिळते. पंकजा चांगल काम करतायेत. त्या प्रदेश कार्यकारीणीला उपस्थित होत्या. महाराष्ट्रातही त्यांचं लक्ष आहे. वेगळा अर्थ घेण्याची गरज नाही, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post