दादरा नगर हवेलीत शिवसेनेच्या कलाबेन डेलकर यांची आघाडी कायम

 दादरा नगर हवेलीत शिवसेनेच्या कलाबेन डेलकर यांची आघाडी कायमसिल्वासा: दादरा नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर यांनी मुंबईत आत्महत्या केल्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक पार पडली. या निवडणुकीच्या निमित्तानं शिवसेनेनं मोहन डेलकर यांच्या पत्नी कलाबेन डेलकर    यांना संधी देत महाराष्ट्राबाहेरील पोटनिवडणूक लढवली. शिवसेनेच्या कलाबेन डेलकर, भाजपचे महेश गावित   आणि काँग्रेसचे महेश धोदी यांच्यात तिरंगी लढत झाली. पोटनिवडणुकीत 75.91 टक्के मतदान पार पडलंय. 333 मतदान केंद्रांवर मतदान झालं. भाजपकडून या निवडणुकीच्या प्रचारासाठी केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव, केंद्रीय मंत्री भारती पवार, पुरुषोत्तम रुपाला आणि महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेकडून आदित्य ठाकरे, संजय राऊत यांनी प्रचारात सहभाग घेतला.

 निवडणूक आयोगाच्या १० वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार शिवसेनेच्या कलाबेन डेलकर यांना १८ हजार ९९२ मते मिळाली आहेत. तर भाजपाच्या महेशभाई गावित यांना १३ हजार ४८६ मते मिळाली आहेत. तर काँग्रेसचे उमेदवार महेशभाई धोडी यांना ७४७ मते मिळाली आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post