सोन्याच्या किंमतीत घसरण....जाणून घ्या आजचा सोन्याचांदीचा भाव

24.11.2021

सोन्याच्या किंमतीत घसरण....जाणून घ्या आजचा सोन्याचांदीचा भाव 



  १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याची किंमत आज ४६,९८० रुपये आहे. मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ४८,२०० रुपये प्रति १० ग्रॅमवरवर ​​बंद झाली होती. गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार चांदी ६२,७०० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात. 

गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ४६,९८० रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर वाढला आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ४७,९८० प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४६,३१० असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ४९,५८० रुपये असेल. नागपूर मध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४६,९८० तर २४ कॅरेट सोन्याचा दर ४७,९८० रुपये इतका असेल. चांदीचा आजचा प्रती १० ग्रॅमचा दर ६२७ रुपये आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post