मोठी बातमी... नगरमधील मोठ्या शिक्षण संस्थेचा लिपिक 'एसीबीच्या' जाळ्यात

मोठी बातमी... नगरमधील मोठ्या शिक्षण संस्थेचा लिपिक 'एसीबीच्या' जाळ्यात


▶️ *आरोपी =  असद युसुफ खान प
ठाण, वय ४२ वर्ष. धंदा- नौकरी, कनिष्ठ लिपिक, वर्ग-३.   एकता कॉलेज ऑफ सायन्स ऍंड कॉमर्स, अहमदनगर,  

राहणार- युसुफ इनामदार यांचे घरात भाड्याने, दरबार चौक, मुकुंदनगर . अहमदनगर. जिल्हा -अहमदनगर

▶️ लाचेची मागणी-₹ ५०००/-

▶️ लाचेची मागणी - दि- २२/११/२०२१

▶️ *लाच स्विकारली रक्कम- ₹*५०००/-

▶️ लाच स्विकारली दिनांक- २२/११/२०२१

▶️   लाचेचे कारण - यातील तक्रारदार हे एकता कॉलेज ऑफ सायन्स ऍंड कॉमर्स, अहमदनगर येथे सायन्स द्वितीय वर्षात शिक्षण घेत होते. त्यांना बी एस सी तृतीय वर्ष रसायनशास्त्र या विषयाकरिता प्रवेश घेण्यासाठी यातील आरोपी लोकसेवक हे प्रवेश फी व्यतिरिक्त ५०००/-₹ मागत असले बाबत ची तक्रार तक्रारदार यांनी ला. प्र. विभागाकडे दिनांक २२/११/२०२१ रोजी केली. त्यावरून आज रोजी एकता कॉलेज येथे लाच मागणी पडताळणी केली असता आरोपी लोकसेवक याने पंचा समक्ष तक्रारदार यांचे कडे ५०००/- ची मागणी केली. त्यानंतर तपोवन रोड  वरील शिवरत्न चहाचे हॉटेल समोर आयोजित सापळा कारवाई दरम्यान सदर लाचेची रक्कम आरोपी लोकसेवक  याने पंचासमक्ष स्विकारली असता त्यास रंगेहाथ पकडण्यात आले. तोफखाना पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू आहे.

▶️ हॅश व्हॅल्यू घेण्यात आली आहे

▶️ सापळा अधिकारी:- पुष्पा निमसे, पोलीस निरीक्षक ला.प्र.वि, अहमदनगर

 ▶️  पर्यवेक्षण अधिकारी -*   हरीष खेडकर, पोलीस उप अधीक्षक,  ला.प्र. वि.अहमदनगर

▶ सापळा पथक:-  पो हवा.संतोष शिंदे, पो ना.रमेश चौधरी, विजय गंगुल, पो अंमलदार रविंद्र निमसे, वैभव पांढरे, बाबासाहेब कराड, महिला पोलीस अंमलदार संध्या म्हस्के,चालक पोलीस हवालदार हारुन शेख, पोलीस नाईक- राहुल डोळसे.

▶ *मार्गदर्शक -*मा.श्री सुनील कडासने सो, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक.

 ▶️ मा.श्री.सतिश भामरे, वाचक पोलीस उपअधीक्षक, ला.प्र.वि. नाशिक.

▶ आरोपीचे सक्षम अधिकारी: मा.संचालक, उच्च शिक्षण विभाग.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post