तीन वेळा तुम्ही कोणामुळे विधानसभेत गेला? विजय औटी यांच्या टिकेला आ.लंके समर्थकाचे 'तिखट' प्रत्युत्तर

 तीन वेळा तुम्ही कोणामुळे विधानसभेत गेला? विजय औटी यांच्या टिकेला आ.लंके समर्थकाचे 'तिखट' प्रत्युत्तरनगर: शिवसेना मेळाव्यात माजी आमदार विजय औटी यांनी केलेल्या टिकेला आ.निलेश लंके समर्थक राहुल झावरे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. सोशल मिडियावर व्हायरल

 झालेल्या पोस्ट मध्ये झावरे यांनी म्हटले आहे की, 
कोण सोनं आणि कोण लोखंड ?


औटी साहेब, विरोधक म्हणून असतीलही आमदारसाहेब तुमच्या लेखी लोखंड, परंतू तुम्ही खरोखर अंतर्मुख होउन विचार केला, २००९ व २०१५ या निवडणूकांमध्ये कोणामुळे आपण विधानसभेेत गेलो ? तुमची पंधारा वर्षे व आमदार साहेबांची कोरोनाचा काळ असूनही दोन वर्षांची कारकिर्द दोन्हींचा तुम्ही डोळे झाकून विचार केला तर तुम्हीच म्हणाल की या लोकप्रतिनिधीने खरोखर संधीचं सोनंच केलंय !

आहो, तब्बल ६१ हजार मतांनी मतदारांनी त्यांना निवडून दिलंय ! विसरला वाटतं तुम्ही ?  एकटाच पठ्या होता ! तुम्ही तर सगळे रथी महारथी गोळा गेले होते !
पंधरा वर्षे तुम्ही लोेकप्रतिनिधी होता. उंची वाढविली असे वारंवार सांगत होता. इतकी उंची होती तर कधी तुम्हाला शेजारच्या श्रीगाेंंदा, शिरूर, जुन्नर अथवा राहुरी तालुक्यात का नाही कोणी बोलविले ?

     आहो, राज्याच्या विधानसभेचे उपाध्यक्ष तुम्ही झाले तरीही कोणी तुम्हाला विचारले नाही हे विसरलात का ? तुम्ही तुम्हाला मिळालेल्या संधीचं काय सोनं केलं हो ? एखादं काम घेऊन येणाऱ्या सामान्य माणसाचा अपमान केला म्हणजे तुम्ही सोन केलं का ? एखाद्याने शिफरास पत्र मागीतलं तरी जणूकाही मुख्यमंत्र्यांच्या अविर्भावात तुमचे बोलणे असायचे ! तुम्ही कोणाची शिफारस तर केलीच नाही. जो येईल त्यालाच अपमानीत करून पाठीमागे पाठविले. हे तुमच्या कारकर्दीचे सोने !

     तुम्ही लोकप्रतिनिधी असतानाच इतर तालुक्यात स्पर्धा परिक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासीका सुरू झाल्या. तुम्हाला का नाही जमले हो ? तुम्ही हुषार,  अभ्यासू म्हणता ना, मग तालुक्यातील अनेक गुणी अधिकारी देश तसेच राज्य पातळीवर काम करीत आहेत. त्यांना त्यांच्या मायभुमीत बोलवून कौतुक करण्याचे तुम्हाला कधी का सुचलं नाही ? माझ्या पारनेरच्या नगरपंचायतीची निवडणूक आहे असेही तुम्ही तुमच्या भाषणात सांगितले. गेली पाच वर्षे तुमच्याच ताब्यात होती नगरपंचायत. काय दिवे लावले हो तुम्ही ? आहो साधा विकास आराखडाही तयार करू शकले नाहीत तुम्ही. नियमित व शुध्द पिण्याचे पाणी दुरच राहिले. समविचारी लोकांना बरोबर घेऊन निवडणूक लढविणार असे आता तुम्ही बोलू लागले आहेत. लोकप्रतिनिधी असताना तुमची ही भाषा होती का ? तुम्हीं जवळही उभे करीत नव्हते कोणाला ! आज समविचारी शोधायची तुमच्यावर वेळ आलीय. यातच सगळं आलं ! सोन्यासारखं काम केलं असत तर ही वेळ आली असती का ?

     कोरोना काळात कुठे होता हो तुम्ही ? नगरपंचायतीच्या तुमच्याच प्रभागात साधा किरणाही पोहच करू शकले नाहीत तुम्ही ! घाबरून तुम्ही घराबाहेरही आले नाहीत ! दुसरीकडे आमदारसाहेबांनी शरदचंद्र पवार आरोग्य मंदीराच्या माध्यमातून ३० हजार गोरगरीबांना जिवदान दिलं. महाराष्ट्र, देश नव्हे तर साऱ्या विश्‍वभरातून आमदारसाहेबांचं कौतुक झालं. तुम्हाला नाही वाटला का अभिमान या लोकप्रतिनिधीचा ? आहो, थेट उत्तरप्रदेश राज्याचे सचिवही  चौकशी करीत होते. कसे चालविता हे कोव्हिड सेंटर ? तरीही तुमच्या लेखी लोकप्रतिनिधीने संधीच लोखंडच केलं ? साहेब तुम्ही कधी कोणाचं कौतुकच केलं  नाही, त्यामुळेच तुमच्यावर ही वेळ आलीय, या वयात मी रस्त्यावर उतरेन, तालुका हादरवून सोडेल म्हणायची !

     तुम्ही फिरणार नाहीत पण कधी जमलंच तर एक दिवस आमदार साहेबांच्या गाडीमागे तुमची गाडी घेऊन या मराठवाडा, विदर्भ, पश्‍चिम महाराष्ट्र, खानदेश, कोकणात. पहा त्या तरूणाईचा जल्लोष. तुम्ही धन्य व्हाल, एकेकाळी तुमच्या सोबत निःस्वार्थपणे काम केलेल्या या लोकप्रतिनिधीने कीती लोकसंग्रह जमाविलाय ! तुमचे डोळे विस्फरल्याशिवाय राहणार नाहीत. एक मात्र खरं की तुम्ही स्वच्छ मनाने बोलाल तर नक्कीच म्हणाल माझ्यानंतरच्या लोकप्रतिनिधीने मिळालेल्या संधीचं सोनं केलंय.

आणि हो, मतदारसंघात सुसंस्कृतपणा राहिला नाही असेही तुम्ही म्हणालात ! आश्चर्य वाटले ऐकून हो . तुमच्याच भाषणात एकीकडे म्हणालात गडाख यांनी निवडणुकीत 'जशी सचिन तेंडुलकरची बॅट हातात घेतली होती तशीच आगामी निवडणुकीत आम्हाला तलवार घ्यावी लागेल' याला सुसंस्कृतपणा म्हणावा का ? मागेही 'कोणी आडकाठी आणली तर मी सगळ्यांचा बाप आहे' असेही तुम्ही बोलला होता. हा सुसंस्कृतपणा आहे का ? आठवत नसेल तर तुमची ही भाषा युट्यूबवर आजही आहे पहा जरा.

असो, तुर्त इतकेच

अ‍ॅड. राहुल बबनराव झावरे
लोकनियुक्त सरपंच, वनकुटे*

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post