जेऊर आरोग्य केंद्राचे काम करणाऱ्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाका

 जेऊर आरोग्य केंद्राचे काम करणाऱ्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाका

गोविंद मोकाटे यांची मागणी ; काम निकृष्ट होत असल्याचा आरोपनगर तालुका- जेऊर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नूतनीकरणाचे काम सुरू असून ते निकृष्ट दर्जाचे होत असल्याचे पंचक्रोशीतील ग्रामस्थांकडून आरोप करण्यात आल्यानंतर माजी पंचायत समिती सदस्य गोविंद मोकाटे यांनी कामाची पाहणी करून सदर ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणी केली आहे. 

    याबाबत सविस्तर माहिती अशी की, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नूतनीकरणाचे काम सुरू असून काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचे पंचक्रोशीतील सरपंच व ग्रामस्थांकडून सांगण्यात आले. तसेच काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याबाबत जेऊर ग्रामसभेत ठराव देखील झालेला आहे. 

      त्या पार्श्वभूमीवर गोविंद मोकाटे यांनी कामाची पाहणी करून काम अत्यंत संथ गतीने व निकृष्ट दर्जाची होत असल्याचा आरोप केला. तसेच सदर ठेकेदार मनमानी करत असून कोणाचे फोन उचलत नाही, काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याने संबंधित ठेकेदाराला काळ्या टाकण्याची मागणी गोविंद मोकाटे यांनी केली आहे.


जेऊर प्राथमिक आरोग्य केंद्र हे जवळपासच्या सोळा गावांसाठी उपयुक्त ठरणार आहे. तसेच नगर-औरंगाबाद महामार्गालगत रूग्णालय होत असल्याने महामार्गावर होणारे अपघात ग्रस्तांना तात्काळ मदत मिळण्यासाठी या रुग्णालयाचा मोठा उपयोग होणार आहे. येथे सुसज्ज रुग्णालय उभारले जाणे गरजेचे आहे. आरोग्य केंद्राचे काम अत्यंत संथ गतीने होत असल्याने सद्यस्थितीत आरोग्य केंद्रात येणारे रुग्ण तसेच वैद्यकीय कर्मचाऱ्यांचीही अतोनात हाल होत आहेत. तरी काम तात्काळ दर्जेदार पणे पूर्ण करावे.

गोविंद मोकाटे (माजी पंचायत समिती सदस्य)

बहिरवाडी, ससेवाडी, धनगरवाडीचे सरपंच व जेऊरचे उपसरपंच तसेच डोंगरगण माजी सरपंच कैलास पटारे यांनी कामाची पाहणी करून काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला होता त्यानंतर काहीही कारवाई झाली नाही त्यामुळे भाजप नगर तालुका उपाध्यक्ष राजेंद्र दारकुंडे यांनी उपोषण करणार असल्याचे सांगितले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post