दिवाळीनंतर बॉम्ब मी फोडेन...थेट शरद पवारांसमोर मलिकांचे पुरावे मांडणार

 दिवाळीनंतर बॉम्ब मी फोडेन...थेट शरद पवारांसमोर मलिकांचे पुरावे मांडणारमुंबई: विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिक यांनी केलेल्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं आहे. नवाब मलिक यांनी लवंगी फटाके लावून मोठा आवाज करण्याचा प्रयत्न केलाय, असा टोला फडणवीसांनी लगावला आहे. नवाब मलिक यांनी जो फोटो ट्विट केला आहे त्यासंदर्भात कालच रिव्हरमार्चच्या टीमनं त्यासंदर्भात स्पष्ट केलं आहे. तो व्यक्ती त्या संघटनेने हायर केलेला होता. रिव्हरमार्च ही संघटना नदी पुनरुज्जीवन करण्याचं काम करते. त्यावेळी मी आणि अमृता फडणवीस यांनी त्या व्यक्तीसोबत फोटो काढला होता. मात्र, जाणीवपूर्वक नवाब मलिकांनी अमृता फडणवीस यांचा फोटो ट्विट केला. 

नवाब मलिकांचे जावई ड्रग्जसह सापडले आहेत. त्यांच्या पद्धतीनं निकष लावल्यास संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस ड्रग्ज माफिया झाली पाहिजे. नवाब मलिक यांनी दिवाळीच्या लवंगी फटाका लावलाय. नवाब मलिकांनी लक्षात ठेवावं दिवाळीनंतर बॉम्ब मी फोडेन. मी काचेच्या घरात राहत नाही,त्यामुळे मी या प्रकरणाचे सर्व पुरावे मांडणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना नवाब मलिक यांचे अंडरवर्ल्डसी संबंध आहेत याचे पुरावे पाठवणार आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. 

नवाब मलिक यांनी सुरुवात केलीय तर मला आता हे प्रकरण अंतापर्यंत न्यावं लागेल. नवाब मलिक एनसीबीवर दबाव आणण्यासाठी हे काम करत आहेत.  

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post