नालायक सरकारला 'त्यांच्या' मृत्यूची हाय लागल्याशिवाय राहणार नाही....

 

नालायक सरकारला 'त्यांच्या' मृत्यूची हाय लागल्याशिवाय राहणार नाही....बीड - भंडारा पाठोपाठ आता अहमदनगर मध्ये देखील रुग्णालयात झालेल्या दुर्घटनेत मोठ्या प्रमाणात लोकांचा मृत्यू झालाय. अहमदनगर मधील जिल्हा रुग्णालयात आतापर्यंत 11 जणांचा मृत्यू झाल्याचं समोर आलंय. राज्यातील विविध ठिकाणी झालेल्या रुग्णालयातील दुर्घटनांना हे नालायक सरकार जबाबदार असून या सरकारला या सर्वांच्या मृत्यूची हाय लागल्याशिवाय राहणार नाही. अशी टीका शिवसंग्रामचे आमदार विनायक मेटे यांनी अहमदनगर घटनेवरून सरकारवर केली आहे.

ते म्हणाले की अतिशय दुःखद घटना आज अहमदनगर येथे झाली आहे. हे सरकार एवढं मुर्दाड मनाचे झाले आहे, की आज 11 लोकं दिवाळीमध्ये मृत्युमुखी पडले आहेत. हॉस्पिटलच्या नाकर्तेपणामुळे त्याठिकाणी कोणतीही सुविधा नसल्यामुळे, ही घटना घडली आहे. या अगोदर देखील भंडाऱ्यात घडलेल्या दुर्घटनेत लहान-लहान मुलांचा त्या ठिकाणी मृत्यू झाला. त्यानंतर सरकार म्हणाले, यानंतर अशा घटना घडू देणार नाही. मात्र अद्याप काही केलं नाही. नाशिकमध्ये देखील एका हॉस्पिटलच्या गॅसच्या पाईपला आग लागली, मुंबईमध्ये देखील मुलुंडच्या हॉस्पिटलला आग लागली, यावर त्यांनी काही केलं नाही.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post