जिल्हा रूग्णालयात अग्नीकांड....पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची पहिली प्रतिक्रिया....

 जिल्हा रूग्णालयात अग्नीकांड....पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची पहिली प्रतिक्रिया....नगर : नगर जिल्हा रूग्णालयात आयसीयु विभागाला लागलेल्या आगीत दहा जणांचा मृत्यु झाला असून अनेक जण गंभीर भाजले आहेत. यापार्श्वभूमीवर पालकमंत्री हसन मुश्रीफ तातडीने कोल्हापूरहून नगरकडे रवाना झाले आहेत. राज्यात यापूर्वीही जिल्हा रूग्णालयात अशा घटना घडल्या असून नगरच्या घटनेतही जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, अशी घोषणा पालकमंत्री मुश्रीफ यांनी कोल्हापूरात केली आहे. या घटनेत दुर्देवीरित्या मृत्यु पावलेल्यांच्या वारसांना मदतीचा हात देण्याचेही त्यांनी जाहीर केले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post