भारतीय संघाचे जोरदार पुनरागमन... अफगाणिस्तानवर दणदणीत विजय

 भारतीय संघाचे जोरदार पुनरागमन.. अफगाणिस्तानवर दणदणीत विजयभारतीय क्रिकेट संघाने  दिवाळीच्या मूहूर्तावर टी20 विश्वचषकाच्या भारत विरुद्ध अफगाणिस्तान सामन्यात दमदार विजय मिळवला आहे. आधी दमदार फलंदाजीने मैदानावर चौकार आणि षटकारांची आतषबाजी करत भारतीय संघाने 210 धावांचां डोंगर उभा केला. त्यानंतर उत्तम गोलंदाजीने अफगाणिस्तानला 144 धावांवर रोखत 66 धावांनी विजय मिळवला.

पहिल्या दोन्ही सामन्यात भारत दारुण पराभूत झाला होता. आधी पाकिस्तानने 10 आणि नंतर न्यूझीलंडने 8 विकेट्सनी मात दिल्यानंतर आज मात्र भारत आपल्या जुन्या रंगात परत आला. एका मोठ्या विजयाची नोंद भारतीय संघाने केली आहे. यावेळी रोहित-राहुल जोडीने उत्तम सलामी देत एक मोठी भागिदारी केली. ज्यानंतर शमी, आश्विन, बुमराह यांच्या गोलंदाजीच्या जोरावर अफगाणिस्तानला कमी धावसंख्येत रोखलं. या विजयामुळे भारतीय संघासह सर्व देशवासी आनंदी झाले आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post