प्रतीक काळे आत्महत्या प्रकरण....भाजपच्या माजी आमदाराने केली मंत्री शंकरराव गडाखांच्या चौकशीची मागणी

 प्रतीक काळे आत्महत्या प्रकरण....भाजपच्या माजी आमदाराने केली मंत्री शंकरराव गडाखांच्या चौकशीची मागणीनगर- मुळा एज्युकेशन मध्ये क्लार्क म्हणून नोकरीस असलेल्या प्रतीक बाळासाहेब काळे याने 29 ऑक्टोबर रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या प्रकरणी आत्महत्येस प्रवृत्त केले म्हणून सात जनांवर गुन्हा दाखल  आहे. 

प्रतीक काळे आत्महत्या प्रकरणी पोलीस दबावात असून, आत्महत्या करण्यापूर्वी प्रतिकने व्हाट्सएप मेसेज, ऑडिओ-व्हिडीओ क्लिप मध्ये जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख, त्यांच्या पत्नी, तसेच भाऊ विजय गडाख यांचीही नावे घेतली आहेत. त्यामुळे या प्रकरणी शंकरराव गडाख यांची पोलिसांनी चौकशी करावी, तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्री शंकरराव गडाख यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी भाजपचे  माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी केली आहे. 

आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीने नगर मध्ये जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालया समोर ठिया आंदोलन केले. त्यावेळी बोलताना माजी आमदार मुरकुटे यांनी गडाख कुटुंबावर अनेक आरोप केले.  वंचितचे जिल्हाध्यक्ष प्रतीक बारसे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post